शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

५४९७ मधून ८३४ विद्यार्थ्यांना मुखपूर्व कर्करोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 9:11 PM

मोठ्यांच्या व्यसनाकडे आकर्षित झालेले अबोध मन, जाहिरातींचा प्रभाव, संगतीचा परिणाम, सहजपणे उपलब्ध होणारे तंबाखूजन्य पदार्थ आणि एकदा चव घेण्याचा मोह आदी कारणांमुळे सातवी ते पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने गडचिरोली जिल्ह्यातील ३५ शाळांमधील ५४९७ विद्यार्थ्यांची तपासणी केली असता तब्बल ८३४ विद्यार्थ्यांना मुखपूर्व कर्करोग असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देगडचिरोली जिल्ह्यातील धक्कादायक स्थिती : तंबाखू, खऱ्र्याचे व्यसन ठरतेय जीवघेणेजागतिक तंबाखूविरोधी दिन

लोकमत  न्यूज नेटवर्क सुमेध वाघमारेनागपूर : मोठ्यांच्या व्यसनाकडे आकर्षित झालेले अबोध मन, जाहिरातींचा प्रभाव, संगतीचा परिणाम, सहजपणे उपलब्ध होणारे तंबाखूजन्य पदार्थ आणि एकदा चव घेण्याचा मोह आदी कारणांमुळे सातवी ते पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने गडचिरोली जिल्ह्यातील ३५ शाळांमधील ५४९७ विद्यार्थ्यांची तपासणी केली असता तब्बल ८३४ विद्यार्थ्यांना मुखपूर्व कर्करोग असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.राज्यात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आहे. परंतु विदर्भाच्या गावखेड्यांपासून ते शहरातील गल्लीबोळातील अनेक छोट्या-मोठ्या चौकातील पानठेल्यांवर व आता किराणा दुकानातही तंबाखूजन्य पदार्थ विशेषत: खर्रा सहज मिळतो. पूर्वी ‘पानां’साठी प्रसिद्ध असलेले पानठेले आता खर्रा, गुटखासाठी प्रसिद्ध आहेत. या पानठेल्यांमधून दिवसभर खर्रा घोटणारी तरुणाई दिसून येते. अनेक पानठेल्यांमध्ये तर खर्रा घोटण्यासाठी आधुनिक यंत्रही बसविण्यात आले आहे. तोंडात खºर्याचा बोकणा आणि जागोजागी उडणाऱ्या त्याच्या लाल पिचकाºयाचे ‘परिणाम’ मात्र, आता दिसून येऊ लागले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या चमूने दोन टप्प्यात विद्यार्थ्यांची तपासणी केली. यात गडचिरोली शहरातील सहा शाळांमधील २१५०, रांगी गावातील सात शाळांमधील ९९७, मुरुम गावातील सहा शाळांमधील १०३५, मार्कंडदेव तहसीलमधील आठ शाळांमधील ६१२ तर भाकरोंडी गावातील सहा शाळांमधील ७०३ विद्यार्थी असे एकूण ३४ शाळांमधील ५४९७ विद्यार्थ्यांची दंत व तोंडाची चाचणी करण्यात आली. यात ८३४ विद्यार्थ्यांना मुखपूर्व कर्करोगाची लक्षणे दिसून आली. टक्केवारीनुसार १५.१७ टक्के विद्यार्थ्यांनी वेळीच उपचार घेतला नाहीतर त्यांना भविष्यात मुख कर्करोग होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे, पाचवी ते पदवीपर्यंतच्या ९५ टक्के विद्यार्थ्यांना तंबाखू व खºर्याचे व्यसन असल्याची बाब उघडकीस आली आहे.२२७ विद्यार्थिनींना मुखपूर्व कर्करोगमुखपूर्व कर्करोगाच्या ८३४ विद्यार्थ्यांमध्ये ५५७ मुले असून २२७ मुली आहेत. ५.४ टक्के मुलींमध्ये कमी वयात तंबाखूचे व्यसन जडल्याने हे विद्यार्थी मुखपूर्व कर्करोगाच्या वाटेवर आहेत. तातडीने उपचार न मिळाल्यास हे विद्यार्थी कर्करोगाच्या विळख्यात सापडण्याची भीती डॉक्टरांनी वर्तवली आहे.

टॅग्स :cancerकर्करोगGadchiroliगडचिरोली