"ओरिजनल शिवसेना म्हणजेच शिंदे गट आम्ही एकत्रित निवडणूक लढवू, मुंबई मनपावर भगवा फडकवू"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2022 18:32 IST2022-09-06T18:27:45+5:302022-09-06T18:32:22+5:30
महाराष्ट्र भाजपचं मिशन महाराष्ट्र आहे. बारामती महाराष्ट्रात येते त्यामुळे मिशन महाराष्ट्रात बारामती आहे, असे फडणवीस म्हणाले.

"ओरिजनल शिवसेना म्हणजेच शिंदे गट आम्ही एकत्रित निवडणूक लढवू, मुंबई मनपावर भगवा फडकवू"
नागपूर : मुंबई महापालिका निवडणुकीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कुठलीही निवडणूक लढत असताना ती आपल्या जीवनातील शेवटची निवडणूक आहे असा विचार करुन तुम्ही स्वत:ला झोकून देता तेव्हाच आपल्याला ती निवडणूक जिंकता येते. हे केवळ एकट्या मुंबई महानगरपालिकेसंदर्भात नव्हतं तर एकूणच निवडणुकीच्या नियोजनाबद्दल होतं, असं फडणवीस म्हणाले. आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केले.
मनसे, शिंदे गट आणि भाजप मुंबईत एकत्र निवडणूक लढणार अशा चर्चा सुरू आहेत, असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता फडणवीस म्हणाले, तुमची पतंगबाजी पाहतो. त्यावेळी मलादेखील मजा येते. ज्याला जे मनात येईल तो ते दाखवितो. ज्याला जे मनात येईल, तस आराखडे बांधतो. ते म्हणाले. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ''मी स्पष्टपणे सांगतो की, भाजप आणि शिवसेना ओरिजनल म्हणजेच शिंदे गट, आम्ही एकत्रित निवडणूक लढवू आणि आम्ही मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवू''.
भाजप प्रदेशाध्यक्ष बारामती दौऱ्यावर आहेत, याबाबत बोलताना भाजपचं मिशन इंडिया आहे. महाराष्ट्र भाजपचं मिशन महाराष्ट्र आहे. बारामती महाराष्ट्रात येते त्यामुळे मिशन महाराष्ट्रात बारामती आहे, असे फडणवीस म्हणाले. यासह, लास्ट फ्रंटीयर वगैरे काही नसतं. आमच्यासाठी राज्यातील प्रत्येक जागा महत्वाची आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
शासकीय कार्यालय आदेशाने चालतात
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे सगळ्यांच्याच मनात आहेत. परंतु, सरकारी कार्यालयं ही नियमांनी चालतात, आदेशानी चालतात. त्यामुळे अशाप्रकारचे आदेश बरेचवेळा काढले जातात. यामुळं फोटोसाठी निर्णय घेण्यात आला. राज्यातच नव्हे तर देशात फुले दाम्पत्याचा मान मोठा आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.