शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

१६ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपुरात ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ चे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 9:50 AM

नागपूर व विदर्भातील संत्र्याचे भारताच्या तसेच जगाच्या कानाकोपऱ्यात ‘ब्रॅण्डिंग’ व्हावे व सोबतच येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर फोकस करून त्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नागपुरात १६, १७ व १८ डिसेंबर रोजी ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देभरगच्च सांस्कृतिक मेजवानीसंत्र्यापासून तयार होणाऱ्या रेसिपी शिका

आॅनलाईन लोकमतनागपूर : नागपूर व विदर्भातील संत्र्याचे भारताच्या तसेच जगाच्या कानाकोपऱ्यात ‘ब्रॅण्डिंग’ व्हावे व सोबतच येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर फोकस करून त्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नागपुरात १६, १७ व १८ डिसेंबर रोजी ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येत आहे. या फेस्टिव्हलमध्ये संत्र्याविषयीचे देश-विदेशातील तज्ज्ञ, उत्पादक सहभागी होतील. या क्षेत्रात रोजगार आणि पर्यटनाची संधी, संत्र्याचे मार्केटिंग यावर विचारांचे आदान-प्रदान होऊन शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग तयार होईल.यूपीएल समूह हे या महोत्सवाचे प्रमुख प्रायोजक असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सहकार्याने आयोजित केला आहे. हे लोकमतचे इनिशिएटिव्ह आहे. १६ डिसेंबर रोजी येथील सुरेश भट सभागृहात या महोत्सवाचे उद्घाटन होईल. या महोत्सवात संगीत, कला, नृत्याची मेजवानी असेल. पण याहून महत्त्वाचे म्हणजे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्रा लागवडीपासून ते संत्रा वाहतुकीपर्यंतच्या ‘आॅरेंज चेन’ची माहिती विविध चर्चासत्र आयोजित करून दिली जाईल. यासाठी आॅरेंज ग्रोवर असोसिएशन आॅफ इंडिया, आयसीएआर- सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांचे सहकार्य लाभले आहे.विदर्भ, महाराष्ट्रासह पंजाब, आंध्र प्रदेश, मणिपूर आदी राज्यांसह इस्रायल, टर्कीमधूनही संत्रा उत्पादक शेतकरी या महोत्सवात सहभागी होतील. संत्र्याचे उत्पादन कसे वाढवावे, गुणवत्ता कशी राखावी यावर ते आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यात सहभागी होऊन लाभ घेण्याची ही एक संधी चालून आली आहे. संत्रा उत्पादनात भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो. तर देशात संत्रा उत्पादनात नागपूरचे अव्वल आहे. संत्रा उत्पदानाच्या मोहिमेत नागपूर नेतृत्व करून भारताला जगात पहिल्या क्रमांकावर पोहचवू शकते. नागपुरी संत्रा भारताच्या तसेच जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचावे यासाठी ‘ब्रॅण्डिंग’ करण्याचा हा प्रयत्न आहे. हा महोत्सव एका वर्षापुरता मर्यादित नाही. तर ही एक चळवळ असून ती वर्षानुवर्षे पुढे न्यायची आहे. नागपूरच्या संत्र्याला जगात महत्त्वाचे स्थान मिळवून द्यायचे आहे.

भरगच्च सांस्कृतिक मेजवानीमहोत्सवात प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचे गायन होईल. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे दिलखेचक नृत्य, बॉलिवूडचे आघाडीचे गायक बेनी दयाल यांचा ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ होईल. याशिवाय युरोप, आफ्रिका, आशिया खंडातून कलाकार येऊन आपली कला सादर करतील. नागपूरकरांसाठी ही एक सांस्कृतिक मेजवानी असेल. क्रीडा संकुल (मानकापूर), ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र या प्रमुख ठिकाणी कार्यक्रम होतील.याशिवाय शहरातीत महत्त्वाच्या ठिकाणी ‘मोबाईल स्टेज’च्या माध्यमातून कलाकार आपली कला सादर करतील. त्यामुळे शहराच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या नागपूरकरांना या महोत्सवाचा आनंद लुटला येर्ईल. महोत्सवादरम्यान जे.जे. स्कूल आॅफ आर्ट, मुंबई व नागपूरचे कलाकार मिळून नागपुरात विविध ठिकाणी संत्राविषयक इन्स्टॉलेशन उभारतील. संत्र्यापासून तयार केलेला ताजमहाल, संत्र्यापासून साकारलेली शेतकरी महिला आदी कलाकृती लक्षवेधी ठरतील.या महोत्सवात होणारी ‘कार्निव्हल परेड’ ही महोत्सवाचा सर्वोच्च बिंदू असेल. यात नागपूरचे कलाकार सहभागी होतील. फिटनेस प्रोग्रामही आयोजित केले जातील. एकूणच महोत्सवातील तीन दिवस नागपूरकरांसाठी कार्यक्रमांची रेचलेच असेल.

संत्र्यापासून तयार होणाऱ्या रेसिपी शिकाप्रसिद्ध मास्टर शेफ विकी रत्नानी हे संत्र्यापासून देशभरात तयार होणाऱ्या विविध रेसिपीची माहिती देतील. तर टी.व्ही. स्टार प्रसिद्ध आॅस्ट्रेलियन मास्टर शेफ सारा टोड जगभरात संत्र्यापासून तयार होणाऱ्या रेसिपी कशा बनवायच्या याचे प्रात्यक्षिक सादर करतील. त्यामुळे अनेकांसाठी संत्रा रेसिपी शिकण्याची ही एक मोठी संधी असेल.नागपूर शहराने जगासाठी आयोजित केलेला हा महोत्सव आहे. या महोत्सवाला शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटनांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपणा सर्वांना मिळून तो यशस्वी करायचा असून नागपूरचे नाव जगाच्या नकाशावर न्यायचे आहे. या महोत्सवाच्या यशस्वीतेसोबतच येत्या काही वर्षात ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल नागपूर’ची जगाच्या इव्हेंट कॅलेंडरमध्ये प्रकर्षाने नोंद होईल व देशविदेशातील पर्यटक यात सहभागी होण्यासाठी रीघ लावतील, यात शंका नाही. महोत्सवात आयोजित प्रदर्शनीत स्टॉलसाठी लोकमत कार्यालयाशी संपर्क साधता येईल.अधिक माहितीसाठी पुढील लिंक्सवर संपर्क साधावा.

Facebook.com/worldorangefestival, Twitter.com/worldorangefest, instagram.com/worldorangefestival 

टॅग्स :agricultureशेती