शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

विद्युत लाईनने घेतला जीव

By admin | Updated: June 21, 2017 02:18 IST

सुगतनगर येथील आरमोर रो-हाऊसच्या छतापासून झाडावर अडकलेल्या बॉलला काढण्याच्या प्रयत्नात

सुगतनगरातील घटना : एकापाठोपाठ दुसऱ्या भावाचाही मृत्यू लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सुगतनगर येथील आरमोर रो-हाऊसच्या छतापासून झाडावर अडकलेल्या बॉलला काढण्याच्या प्रयत्नात उच्चदाबाच्या विद्युत लाईनचा धक्का बसलेला दुसरा जुळा भाऊ पीयूष संजय धर याचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने धर कुटुंबावर दु:खाची कुऱ्हाड कोसळली. ३१ मे रोजी संजय धर यांची प्रियांश व पीयूष धर ही दोन्ही जुळी मुले घराच्या छतावर खेळत होती. घराच्या जवळून उच्चदाबाची विद्युत लाईन गेली आहे. खेळताना बॉल झाडावर अडकला. तो काढण्याच्या प्रयत्नात असतानाच दोन्ही मुले उच्चदाबाच्या विद्युत लाईनचा संपर्कात येऊन जळाली. शेजारच्या लोकांच्या हे लक्षात येताच दोन्ही मुलांना एका खासगी इस्पितळात भरती केले. उपचार सुरू असतानाच गेल्या शुक्रवारी प्रियांश (११) याचा मृत्यू झाला. दुसरा मुलगा पीयूषवर (११) शर्थीचे उपचार सुरू होते. गेल्या दोन दिवसापासून पीयूषला श्वास घ्यायला त्रास होत होता. फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन पसरले होते. सोमवारी रात्री डॉक्टरांनी पीयूषला व्हेंटिलेटरवर ठेवले. मंगळवारी सकाळी ८ वाजता पीयूषने शेवटचा श्वास घेतला. संजय धरच्या जुळ्या मुलांच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली. पीयूषच्या अंत्ययात्रेत त्याच्या नातेवाईकांसोबतच मोठ्या संख्येत परिसरातील नागरिकही सहभागी झाले होते. मी पण जिवंत राहणार नाही माझी दोन्ही मुले गेली, आता मी पण जिवंत राहणार नाही, असे म्हणत प्रियांश व पीयूषची आई चित्रा धाय मोकलून रडत होती. या घटनेने हॉस्पिटलचे वातावरणही भावूक झाले होते. अखेर चित्रा यांना कुटुंबातील लोकांनी डॉक्टरांच्या मदतीने इंजेक्शन देऊन नियंत्रित केले. अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये अंत्ययात्रेच्यावेळी बेशुद्धसारख्या अवस्थेत चित्रा मुलाचा फोटो आणि त्याच्या मृतदेहाकडे शून्यात हरविल्यासारखे पहात होत्या. पीयूष वाचेल, या आशेवर असलेल्या वस्तीतील नागरिकांनाही या घटनेचा मोठा धक्का बसला. सर्वच जण शोकमग्न होते.