लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जमिनीचे आणि मानवाचे आरोग्य सृदृढ रहावे म्हणून सेंद्रीय शेतीला शासनाने प्रोत्साहन दिले आहे. शासनाच्या शाश्वत शेती अभियानांतर्गत सेंद्रिय शेती कार्यक्रम नागपूर जिल्ह्यात २०१५-१६ पासून राबविण्यात आला आहे. यात ४६ बचत गटांकडून जिल्ह्यात २३०० एकरमध्ये सेंद्रिय शेती होत आहे. सेंद्रिय शेतीतून उत्पादित होणाऱ्या उत्पादनाला भरपूर मागणी असून, सध्यातरी उत्पादक ते ग्राहक अशी थेट विक्री प्रक्रिया सुरू आहे. यात शेतकऱ्यांचे अधिकचे श्रम असले तरी, शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढली आहे.अॅग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी (आत्मा)च्या माध्यमातून सेंद्रिय शेती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ५० शेतकऱ्यांचा एक गट असे ४६ गट ११ तालुक्यांमध्ये सेंद्रिय शेती करीत आहेत. जवळपास २३०० एकरवर हा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पात ज्या गटांची निवड झाली आहे, त्यांच्याकडे सेंद्रिय शेतीचे संकल्पपत्र भरून घेतले आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गटाला प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांचे अभ्यासदौरे काढण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतावर सेंद्रिय निविष्ठा तयार करणे, गांडूळ खत, औषध तयार करण्याचे प्रात्यक्षिक दिले आहे.सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपिकता वाढली आहे. शिवाय उत्पादनातही वाढ झाली आहे. पिकांवर होणाऱ्या किडीचे परिणाम दिसून येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पिकांच्या विक्रीसाठी शेतकºयांना भटकावेही लागत नाही. सेंद्रिय पिकांचा ब्रॅण्डआत्माने सेंद्रिय उत्पादनाचा (एनओएफपीएस) या नावाने ब्रॅण्ड तयार केला आहे. प्रत्येक बचत गटांचे पीजीएस इंडिया वर आॅनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे. त्याचे सर्टिफिकेट सुद्धा उपलब्ध आहे. शिवाय उत्पादित मालाची ‘एनएबीएल’ अॅक्रिडेटेड लॅबमध्ये पेस्टीसाईडची तपासणी सुद्धा होत आहे. २० गटांचा नवीन प्रस्ताव पाठविला आहेया कार्यक्रमात सुरुवातीला भरपूर त्रास झाला. पण शेतकऱ्यांनी केलेली मेहनत आणि त्यांना मिळालेला प्रतिसाद यामुळे आता शेतकरी वाढत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी एक एकर शेती या प्रकल्पात दिली होती. ते आता पाच एकर शेती या कार्यक्रमासाठी देत आहे. सेंद्रिय शेतीला शेतकऱ्यांना होत असलेला फायदा लक्षात घेता आणखी शेतकऱ्यांचे गट या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तयार झाले आहेत. अशा २० गटांचे प्रस्ताव आम्ही पाठविले आहे.डॉ. नलिनी भोयर, प्रकल्प संचालक, आत्मा
४६ गटांकडून होतेय २३०० एकरमध्ये सेंद्रिय शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 01:44 IST
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जमिनीचे आणि मानवाचे आरोग्य सृदृढ रहावे म्हणून सेंद्रीय शेतीला शासनाने प्रोत्साहन दिले आहे. शासनाच्या ...
४६ गटांकडून होतेय २३०० एकरमध्ये सेंद्रिय शेती
ठळक मुद्देउत्पादक ते ग्राहक अशी थेट विक्री : शेतकऱ्यांची क्रयशक्तीही वाढली