बायपासला पर्याय लेफ्टमेन अॅन्जीओप्लास्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:48 IST2017-10-09T01:48:06+5:302017-10-09T01:48:18+5:30
ब्लॉकेजेस जास्त असतील तर रुग्णांना बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. परंतु ह्रदयशस्त्रक्रियेसंदर्भात आलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे बायपासला पर्याय म्हणुन लेफ्टमेन अॅन्जीओप्लॅस्टी ही शस्त्रक्रिया पुढे आली आहे.

बायपासला पर्याय लेफ्टमेन अॅन्जीओप्लास्टी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ब्लॉकेजेस जास्त असतील तर रुग्णांना बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. परंतु ह्रदयशस्त्रक्रियेसंदर्भात आलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे बायपासला पर्याय म्हणुन लेफ्टमेन अॅन्जीओप्लॅस्टी ही शस्त्रक्रिया पुढे आली आहे. या शस्त्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे बायपासपेक्षा कमी खर्च, कमी वेदना आणि दुसºयाच दिवशी रुग्ण घरी असतो, असा दावा अर्नेजा हार्ट अॅण्ड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. जसपाल अर्नेजा यांनी केला.
हृदयरोगावर उपचाराच्या क्षेत्रात आमूलाग्र क्रांती झाली आहे. उपचाराच्या अद्ययावत पद्धतींची उदयोन्मुख डॉक्टरांना माहिती व्हावी आणि रुग्णांनाही त्याचा लाभ मिळावा, या उद्देशाने अर्नेजा हार्ट अॅन्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे शनिवारी हॉटेल तुली इम्पेरियलमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
मध्य भारतातील १५ हृदयरोग तज्ज्ञ या कार्यशाळेत सहभागी झाले होते. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ आणि रुग्णालयाचे संचालक डॉ. जसपाल अर्नेजा यांनी सादरीकरणाद्वारे हृदयरोगावर उपचाराच्या अत्याधुनिक पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, व्यस्त जीवनशैलीमुळे हृदयरोगाशी संबंधित गुंतागुंतही वाढत आहे. देशात अॅन्जिओप्लास्टी मोठ्या प्रमाणावर होत असली तरी लेफ्टमेन अॅन्जिओप्लास्टी फार कमी डॉक्टर करतात.
मध्यभारतात अर्नेजा रुग्णालयाने सर्वप्रथम लेफ्टमेन अॅन्जिओप्लास्टी सुरू केली. आजवर ४०० हून अधिक रुग्ण हाताळण्यात आले आहेत. वाढत्या वयोमानासोबतच आर्टरीमध्ये निर्माण होणारे ब्लॉकेजेस कॅल्शियममुळे अगदी दगडासारखे होतात. त्यावर रोटाब्लेशनचा पर्याय उपलब्ध आहे.
या पद्धतीत अगदी अॅन्जिओप्लास्टीप्रमाणेच ‘डायमंड पार्टीकल’ प्रतिमिनिट दीड ते दोन लाख रोटेशन येवढ्या गतीने फिरवून ब्लॉकेजेस काढून घेतले जातात. आतापर्यंत १५० ते २०० रुग्णांवर रोटाब्लेशनद्वारे उपचार करण्यात आले आहे. रोटाब्लेशन अथवा लेफ्टमेन अॅन्जिओप्लास्टीसाठी ‘आयव्हास’ करणे गरजेचे आहे. त्यामुळे आर्टरीतील ब्लॉकेजेसची अगदी सूक्ष्मपद्धतीने माहिती मिळते.