शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

विरोधकांच्यादेखील गुणांची कदर झाली पाहिजे : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:43 PM

आपल्या समाजात अनेक गुणी माणसे आहेत. त्यांच्या गुणांची कदर झाली पाहिजे. लोकांच्या नकारात्मक बाजूपेक्षा गुणांची चर्चा जास्त झाली तर समाज सशक्त होतो. गुणांची पारख करणारे व कौतुक करणारे लोकदेखील वाढायला हवेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विरोधकांच्यादेखील गुणांची कदर झाली पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. भोसले प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या राजरत्न पुरस्कारांचे गुरुवारी वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

ठळक मुद्दे‘राजरत्न पुरस्कार-२०१९’चे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या समाजात अनेक गुणी माणसे आहेत. त्यांच्या गुणांची कदर झाली पाहिजे. लोकांच्या नकारात्मक बाजूपेक्षा गुणांची चर्चा जास्त झाली तर समाज सशक्त होतो. गुणांची पारख करणारे व कौतुक करणारे लोकदेखील वाढायला हवेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विरोधकांच्यादेखील गुणांची कदर झाली पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. भोसले प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या राजरत्न पुरस्कारांचे गुरुवारी वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.महाल येथील सिनियर भोसला पॅलेस येथे आयोजित या पुरस्कार सोहळ्याला अंजनगाव सुर्जी येथील श्री देवनाथ मठाचे श्रीनाथ पीठाधीश्वर आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज, भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजे रघुजी महाराज भोंसले, राजरत्न पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. राजे मुधोजी भोसले, कार्यक्रमाचे संयोजक लक्ष्मीकांत देशपांडे, ठाकूर किशोरसिंह बैस प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील नऊ जणांचा सन्मान करण्यात आला. आपल्या समाजात दुसऱ्यांना मार्ग दाखविणारे अनेक जण दिसून येतात. मात्र अनेक जण स्वत: त्या मार्गावर चालत नाहीत. केवळ मार्ग दाखविणे याने काम होणार नाही. मार्ग दाखविण्यापेक्षा त्या मार्गावर चालणारे झाले पाहिजे, दुसऱ्यांच्या आदर्श मार्गावर चालण्याची लोकांची इच्छा असते. मात्र हिंमत होत नाही. त्यांच्यात आत्मविश्वास जागविला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. मोहन भागवत यांनी केले. देशातील इतर राजघराणे आपापसातील भांडणात व्यस्त राहिले. मात्र भोसले घराण्याने अंतर्गत कलह टाळला. राजांमध्ये अहंकार असायचा. मात्र भोसले त्यापासून दूर राहिले. अहंकाराला नियंत्रणात आणण्यासाठी परिश्रम करावे लागतात, असेदेखील ते म्हणाले.पुरस्कार हे चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींना समोर जाण्याची प्रेरणा देतात. कर्तृत्वाची पूजा ही कर्तृत्ववान व्यक्तीच करु शकतात, असे सांगत आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी भोसले घराण्याच्या महत्तेवर प्रकाश टाकला. राजे मुधोजी भोसले यांनी प्रास्ताविकातून पुरस्कारांबाबत माहिती दिली. एम.ए.कादर व सारंग ढोक यांनी संचालन केले तर ठाकूर किशोरसिंह बैस यांनी आभार मानले. अर्जुन कृष्णन्न नायर याने गणेशवंदना नृत्य सादर केले.शहीद सैनिकांना श्रद्धांजलीपुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना कार्यक्रमादरम्यान श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्व मान्यवर तसेच उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली अर्पण केली.यांचा झाला गौरव

  • स्वानंद पुंड (इतिहास, साहित्य)
  • विष्णू मनोहर (वैशिष्ट्यपूर्ण कार्य)
  • स्मिता काटवे-मामारर्डे (क्रीडा)
  • संतोष साळुंके (सांस्कृतिक)
  • जयंत हरकरे (पत्रकारिता छायाचित्रकार)
  • अविनाश पाठक (पत्रकारिता)
  • अर्जुन कृष्णन्न नायर (वैशिष्ट्यपूर्ण कार्य-१८ वर्षांखालील)
  • सार्थक धुर्वे (क्रीडा-१८ वर्षांखालील)

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूर