ऑपरेशन फॉल ऑलआउट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:09 IST2020-11-28T04:09:09+5:302020-11-28T04:09:09+5:30
\Sऑपरेशन फॉल ऑलआउट चार गुन्हेगार जेरबंद : शस्त्रे जप्त, नंदनवन पोलिसांची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नंदनवन पोलिसांनी ...

ऑपरेशन फॉल ऑलआउट
\Sऑपरेशन फॉल ऑलआउट
चार गुन्हेगार जेरबंद : शस्त्रे जप्त, नंदनवन पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नंदनवन पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री ऑपरेशन फॉल ऑलआऊट राबविताना चार गुन्हेगारांना पकडले. त्यांच्याकडून तलवार, चाकू, रॉड जप्त केले.
नंदनवनचे सहायक पोलीस निरीक्षक देवकर आपल्या सहकाऱ्यांसह गुरुवारी मध्यरात्री नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त करीत होते. निर्मलनगरीच्या मागे सूतगिरणी मार्गावर एका ठिकाणी आरोपी शाहरुख ऊर्फ शुभम युवराज शेंडे, सोनू ऊर्फ मोगली राजू पाठक, कुणाल ऊर्फ टिम्या श्रीकांत मेश्राम आणि कल्या ऊर्फ सोनू गणेश शारे तसेच त्यांचा एक साथीदार संशयास्पद हालचाल करताना दिसले. पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेऊन पाचपैकी चौघांना पकडले. अंधाराचा फायदा घेऊन एक आरोपी पळून गेला. पकडलेल्या आरोपींकडून पोलिसांनी तलवार, चाकू, लोखंडी रॉड, मिरची पावडर आणि नायलॉनची दोरी तसेच ४२० रुपये जप्त केले.
सर्व आरोपी दरोड्याच्या तयारीत होते. वेळीच पोलिसांनी त्यांना अटकाव केल्याने मोठा गुन्हा टळला. फरार झालेल्या एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
---