नागपुरात दोन कौशल्य विकास केंद्रांची सुरुवात; नागपूर विद्यापीठ व सावनेर येथील रेवनाथ चौरे महाविद्यालयात कौशल्य केंद्र

By आनंद डेकाटे | Published: March 15, 2024 03:24 PM2024-03-15T15:24:41+5:302024-03-15T15:24:54+5:30

कौशल्य विकास व स्वयंरोजगाराच्या संधी अधिकाधिक युवक युवतींना मिळाव्यात, या दृष्टिकोनातून राज्यामध्ये १०० कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात यातील दोन कौशल्य विकास केंद्रे नागपूर मध्ये सुरू करण्यात आली आहेत.

Opening of two Skill Development Centers in Nagpur; | नागपुरात दोन कौशल्य विकास केंद्रांची सुरुवात; नागपूर विद्यापीठ व सावनेर येथील रेवनाथ चौरे महाविद्यालयात कौशल्य केंद्र

नागपुरात दोन कौशल्य विकास केंद्रांची सुरुवात; नागपूर विद्यापीठ व सावनेर येथील रेवनाथ चौरे महाविद्यालयात कौशल्य केंद्र

नागपूर : कौशल्य विकास व स्वयंरोजगाराच्या संधी अधिकाधिक युवक युवतींना मिळाव्यात, या दृष्टिकोनातून राज्यामध्ये १०० कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात यातील दोन कौशल्य विकास केंद्रे नागपूर मध्ये सुरू करण्यात आली आहेत.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व सावनेर येथील रेवनाथ चौरे महाविद्यालयात ही कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे याचे उद्घाटन करण्यात आले. नागपुरातून उद्घाटनप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, प्राचार्य डॉ. संजय चौरे, गणित विभाग प्रमुख डॉ. गणेश केदार, संचालक डॉ. निशिकांत राऊत, प्लेसमेंट अधिकारी डॉ. भूषण महाजन, डॉ. सुरेश मेश्राम आणि रेवनाथ चौरे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याबाबत अधिक माहितीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ७४९८१३४१४८ आणि सावनेर येथील रेवनाथ चौरे महाविद्यालयाच्या ९७६६४९१५९६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

- २० हजार युवक-युवतींना प्रशिक्षण

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दृष्टिकोनातून महाविद्यालयीन शिक्षणासह व्यावसायिक कौशल्य विकसित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रथम टप्यात ३ हजार ५०० महाविद्यालयांमधून १०० महाविद्यालयांची निवड करण्यात आली आहे. टप्याटप्याने यात महाविद्यालयांचा सहभाग वाढविण्यात येईल. प्रत्येक कौशल्य विकास केंद्रातून किमान १५० युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून राज्यात किमान २० हजार युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल आणि त्यासाठी सुसंगत अभ्यासक्रमाची देखील निवड करण्यात येईल.

Web Title: Opening of two Skill Development Centers in Nagpur;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.