शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रस्त्यावर खुलेआम दारूची विक्री !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 22:32 IST

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाईन शॉप, बीअर शॉपीच्या संचालकांना घरपोच दारू पोहोचविण्याची परवानगी दिली आहे. या शिवाय दुकानातील डिलिव्हरी बॉयला आरोग्याबाबतच्या प्रमाणपत्रासोबत मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत नियम तयार करण्यात आले आहेत. परंतु या नियमांचे वाईन शॉपचे संचालक आणि त्यांचे डिलिव्हरी बॉय सर्रास उल्लंघन करीत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देदुकानापासून काही अंतरावर डिलिव्हरी बॉय करताहेत विक्री‘लोकमत ऑन द स्पॉट’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाईन शॉप, बीअर शॉपीच्या संचालकांना घरपोच दारू पोहोचविण्याची परवानगी दिली आहे. या शिवाय दुकानातील डिलिव्हरी बॉयला आरोग्याबाबतच्या प्रमाणपत्रासोबत मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत नियम तयार करण्यात आले आहेत. परंतु या नियमांचे वाईन शॉपचे संचालक आणि त्यांचे डिलिव्हरी बॉय सर्रास उल्लंघन करीत असल्याचे दिसत आहे.वाईन शॉपवर ग्राहकांची गर्दी होऊ नये यासाठी दुकानदारांना ऑनलाईन, व्हॉट्सअ‍ॅप आणि मोबाईलवर ऑर्डर करण्यासाठी मोबाईल क्रमांक जारी करावयाचे होते. ऑर्डरसाठी ग्राहकांना परमिट क्रमांक (असल्यास) नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ब्रॅण्ड आणि किती माल हवा ते लिहून पाठवावयाचे आहे. परंतु ही सर्व माहिती दिल्यानंतर आणि दुकानदाराने ऑर्डर मान्य केल्यानंतरही ग्राहकांना होम डिलिव्हरी मिळत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे डिलिव्हरी बॉईज दुकानातून बॅगमध्ये दारुच्या बॉटल्स ठेऊन डिलिव्हरीसाठी बाहेर पडत आहेत. परंतु डिलिव्हरीच्या नावाखाली दुकानापासून काही अंतरावर ओळखीच्या व्यक्तींना आणि दारू विक्रीशी निगडित व्यक्तींना दारूच्या बॉटल विकताना दिसत आहेत. खलाशी लाईन मार्गावर काही व्यक्ती डिलिव्हरी बॉयला घेराव घातलेले दिसले. अशाच प्रकारची दुसरी घटना एलआयसी चौक, नायडू हॉस्पिटलच्या समोरील सुनील वाईन शॉपसमोर दुपारी ४.३० वाजता पाहावयास मिळाली. या दुकानासमोरही ग्राहकांची गर्दी होती. येथे ग्राहक शारीरिक अंतराचे पालन करीत नसल्याचे आढळले. वाईन शॉपमधून काळ्या बॅगमध्ये दारुच्या बॉटल घेऊन निघालेला डिलिव्हरी बॉय दुकानाच्या दुसऱ्या बाजूला नायडु हॉस्पिटलसमोर उभा राहिला. तेथेच रस्त्यावर काही युवक जमा झाले. हा डिलिव्हरी बॉय त्यांना दारूच्या बॉटल देत होता. काही वेळ रस्त्यावर ग्राहकांची गर्दी जमा झाली होती. शुक्रवारपासून मोबाईल, व्हॉट्सअ‍ॅपवर ऑर्डर दिल्यानंतर डिलिव्हरी न मिळाल्यामुळे अनेक ग्राहक चौकशी करण्यासाठी दुकानात पोहोचले होते. त्यांनी हा प्रकार पाहताच वाईन शॉपच्या शेजारच्या दुकानात बसलेले दुकानाचे संचालक सुधीर यांना होम डिलिव्हरी मिळाली नसल्याचे सांगितले. शिवाय डिलिव्हरी बॉय खुलेआम रस्त्यावर दारूची विक्री करीत असल्याची तक्रार केली. त्यावर संचालकांनी उद्या डिलिव्हरी देण्याचा दावा करून ग्राहकांना परत पाठविले.काय आहे कारवाईची तरतूदजिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी जारी केलेल्या सुधारित आदेशात कोरोनामुळे घरपोच सेवा देण्यासाठी दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास संबंधित दुकानाचा परवानाधारक व दोषी विरुद्ध कारवाई होणार असल्याचे सांगितले होते. आदेशात दोषींवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६०, संक्रमण आजार कायदा १८९७, भारतीय दंड विधानच्या कलम १८८ व महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ नुसार कायदेशीर कारवाई होणार असल्याचे नमूद केले होते.

टॅग्स :liquor banदारूबंदीonlineऑनलाइन