शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

बनावट प्रमाणपत्रे तयार करणारे रॅकेट उघड

By admin | Published: June 26, 2016 2:46 AM

विविध प्रकारची बनावट प्रमाणपत्रे तयार करून ती नागरिकांना विकणाऱ्या रॅकेटचा महसूल विभागाच्या पथकाने छडा लावला.

आरोपी फरार: बनावट शिक्के जप्तनागपूर : विविध प्रकारची बनावट प्रमाणपत्रे तयार करून ती नागरिकांना विकणाऱ्या रॅकेटचा महसूल विभागाच्या पथकाने छडा लावला. या रॅकेटचा सदस्य असलेल्या एकाच्या घरी शुक्रवारी रात्री छापा घालण्यात आला. यावेळी या पथकाला मोठ्या प्रमाणात बनावट प्रमाणपत्रे आणि विविध अधिकाऱ्यांची शिक्के आढळले. आरोपी मात्र पळून गेला. या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुटमळणाऱ्या दलालांचे धाबे दणाणले आहे.शाळा-महाविद्यालये प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने पालकांची विविध प्रमाणपत्रांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गर्दी असते. या गर्दीत शिरून झटपट प्रमाणपत्र मिळवून देण्याचे दलाल आमिष दाखवतात. त्या बदल्यात संबंधित पालकांकडून मोठी रक्कम उकळून त्यांच्या हातात बनावट प्रमाणपत्र ठेवले जाते. गेल्या अनेक दिवसांपासून हा गोरखधंदा सुरू आहे. फसवल्या गेलेल्या पालकांकडून जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रारीचा ओघ वाढल्याने महसूल विभागामार्फत त्याची गोपनीय चौकशी करण्यात आली. वैशालीनगर, पाचपावलीतील आरोपी अतुल बबन तलमले हा बनावट प्रमाणपत्रे तयार करून विकत असल्याची माहिती कळताच तहसीलदार गजेंद्र रामकृष्ण बालपांडे यांनी सहकाऱ्यांसह शुक्रवारी सायंकाळी त्याच्या घरी छापा घातला.