...तरच वाढेल मतदानाची टक्केवारी, सिनिअर सिटीजन फोरमचे मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र
By मंगेश व्यवहारे | Updated: April 16, 2024 18:11 IST2024-04-16T18:10:47+5:302024-04-16T18:11:19+5:30
"मतदाराला बसण्याकरीता ५० खुर्च्यांची सोय करावी. तापमानाची स्थिती लक्षात घेता मंडपात कुलर व फॅनची व्यवस्था करावी. थंड पाण्याची सोय करावी, ज्येष्ठ नागरीकांना प्रथम प्राधान्य देऊन मतदान करून घ्यावे. केंद्राजवळ डॉक्टर व रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात यावी."

...तरच वाढेल मतदानाची टक्केवारी, सिनिअर सिटीजन फोरमचे मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र
नागपूर : लोकसभेच्या निवडणुकीचे मतदान १९ एप्रिलला होणार असून, शहरात सद्या तापमान ४० डिग्रीवर पोहचले आहे. या तापमानात ज्येष्ठ नागरिक, महिला व सामान्य नागरिक दुपारी १२ नंतर घराबाहेर पडण्याचे धाडस करणार नाही. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर मोठा फरक पडू शकतो.
त्यासाठी प्रशासनाने मतदान केंद्रावर सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी सिनिअर सिटीजन फोरम उत्तर नागपूरतर्फे राज्याचे मुख्य निवडणुक आयुक्तांना केली आहे. त्यांनी पाठविलेल्या पत्रात मागणी केली की, मतदान केंद्राबाहेर सावलीसाठी २० बाय ३० चा मंडप टाकावा. मतदाराला बसण्याकरीता ५० खुर्च्यांची सोय करावी. तापमानाची स्थिती लक्षात घेता मंडपात कुलर व फॅनची व्यवस्था करावी. थंड पाण्याची सोय करावी, ज्येष्ठ नागरीकांना प्रथम प्राधान्य देऊन मतदान करून घ्यावे. केंद्राजवळ डॉक्टर व रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात यावी.