शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

फक्त पोस्टरबाजी व रंगरंगोटीत ‘स्वच्छता’! कसा येणार नागपूरचा अव्वल नंबर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 01:00 IST

केंद्रीय पथक न सांगता स्वच्छ सर्वेक्षणासाठी येणार असल्याचे आधीच निश्चित होते. त्यानुसार मंगळवारी अचानक केंद्राचे पथक नागपुरात पोहचले. परंतु पथकाच्या दौऱ्याबाबत महापालिका प्रशासन सक्रिय असल्याचे दिसत नाही. विशेषत: झोनचे सहायक आयुक्त, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, झोनल अधिकारी अजूनही सक्रिय झाल्याचे दिसत नाहीत.स्वच्छता सर्वेक्षणाच्या नावाखाली फ क्त पोस्टर, बॅनरबाजी व भिंतीची रंगरंगोटी करून सज्ज असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले आहे. प्रत्यक्षात रस्त्यांच्या कडेला, कचरा संकलन सेंटर, कॉलनी, मोकळे भूखंड व ले-आऊ ट येथे कचऱ्या चे ढिगारे कायम आहेत. तो उचलण्यासाठी कुणीही पुढाकार घेतलेला दिसत नाही.

ठळक मुद्देसर्वेक्षणाबाबत अधिकारी उदासीन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय पथक न सांगता स्वच्छ सर्वेक्षणासाठी येणार असल्याचे आधीच निश्चित होते. त्यानुसार मंगळवारी अचानक केंद्राचे पथक नागपुरात पोहचले. परंतु पथकाच्या दौऱ्याबाबत महापालिका प्रशासन सक्रिय असल्याचे दिसत नाही. विशेषत: झोनचे सहायक आयुक्त, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, झोनल अधिकारी अजूनही सक्रिय झाल्याचे दिसत नाहीत.स्वच्छता सर्वेक्षणाच्या नावाखाली फ क्त पोस्टर, बॅनरबाजी व भिंतीची रंगरंगोटी करून सज्ज असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले आहे. प्रत्यक्षात रस्त्यांच्या कडेला, कचरा संकलन सेंटर, कॉलनी, मोकळे भूखंड व ले-आऊ ट येथे कचऱ्या चे ढिगारे कायम आहेत. तो उचलण्यासाठी कुणीही पुढाकार घेतलेला दिसत नाही.स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त अभिजित बांगर संवेदनशील आहेत. त्यांनी कार्यालयांचे अचानक निरीक्षण केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेबाबत निर्देश दिले. परंतु त्यानंतरही झोन कार्यालये सक्रिय नसल्याचे चित्र आहे. याचा फटका सर्वेक्षणाच्या क्रमावारीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.वर्ष २०१७ मध्ये स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर शहर १३३ व्या क्रमांकावर होते. प्रयत्नानंतर २०१८ मध्ये क्रमवारीत सुधारणा होऊ न ५५ व्या क्रमांकावर आले. घराघरातून कचरा संकलन करून भांडेवाडी डम्पिंगयार्ड येथे नेण्यात येतो. परंतु यावर समाधान मानता येणार नाही. त्यामुळेच आयुक्तांनी झोन कार्यालयांचा अचानक दौरा केला. नेहरूनगर व गांधीबाग झोनचे आरोग्य निरीक्षक यांना निलंबित केले. अनेक अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या. स्वच्छतेच्या बाबतीत कोणत्याही स्वरूपाची तडजोड स्वीकारली जाणार नाही, असा इशारा आयुक्तांनी दिला होता. स्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजीपणा केल्यास तात्काळ निलंबित करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतरही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजात अपेक्षित सुधारणा झाल्याचे दिसत नाही.बॅनर व पोस्टरबाजीने भागणार नाहीस्वच्छ सर्वेक्षणाबाबत लोकांत जागृती निर्माण व्हावी, यासाठी महापालिकेतर्फे बॅनर, पोस्टर व भिंतीची रंगरंगोटी क रण्यात आली आहे. यात ‘स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर’चा संदेश देण्यात आला आहे. मात्र कचरा संकलनाच्या प्रक्रियेत सुधारणा झाली नसल्याने याचा फारसा लाभ होताना दिसत नाही. कनक रिसोर्सेस कंपनीकडे घराघरातून कचरा संकलनाची जबाबदारी आहे. शहरालगतच्या भागात दररोज कचरा संकलित केला जात नाही. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने कचरा उडघड्यावर टाकावा लागतो.कचरा प्रक्रियेत मनपा माघारलीओला व सुका कचरा वेगवेळा संकलित करण्यासाठी डस्टबिन वितरण अयशस्वी ठरले आहे. शहरात दररोज १२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यावर प्रक्रिया होत नाही. गेल्या काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बायोमायनिंग प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. त्याशिवाय दुसरी प्रभावी यंत्रणा कार्यरत नाही. स्वच्छता सर्वेक्षणात कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याचा मुद्दा महागात पडणार असल्याची चर्चा आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान