स्वाभिमानी नागपूरची जनताच दाखवेल सत्तेचा मार्ग; बसपा प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 08:00 IST2021-10-28T08:00:00+5:302021-10-28T08:00:11+5:30

Nagpur News समाजाचा स्वाभिमान जिवंत ठेवून शासनकर्ती जमात तयार करण्याचे काम नागपूरकर जनता करेल, असा विश्वास बसपाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजने यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.

Only the people of Swabhimani Nagpur will show the way to power; BSP state president Adv. Sandeep Tajne | स्वाभिमानी नागपूरची जनताच दाखवेल सत्तेचा मार्ग; बसपा प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजने 

स्वाभिमानी नागपूरची जनताच दाखवेल सत्तेचा मार्ग; बसपा प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजने 

नागपूर : राज्यभरात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी तसेच अल्पसंख्याकांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकाळात पीडित, शोषित, उपेक्षित मुख्य प्रवाहापासून आणखी दूर ढकलले गेले आहेत. अशात समाजाचा स्वाभिमान जिवंत ठेवून शासनकर्ती जमात तयार करण्याचे काम नागपूरकर जनता करेल, असा विश्वास बसपाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजने (Sandip Tajne) यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.

येत्या नागपूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांची जागा दाखवून देण्याचे काम बसपा करेल. समाजकारणासाठी ‘सत्ता’ असे सरळ ध्येय बसपाचे आहे. यामुळे निवडणुकांच्या अनुषंगाने तयारीला लागण्याच्या सूचना त्यांना यावेळी केल्या.

यावेळी महेंद्र रामटेके, सुनील डोंगरे, नागोराव जयकर, अविनाश वानखेडे, नितीन शिंगाडे, विजयकुमार डहाट, संदीप मेश्राम, मनपा गटनेते जितेंद्र घोडेस्वार, राजीव भांगे, शादाफ भाई उपस्थित होते.

Web Title: Only the people of Swabhimani Nagpur will show the way to power; BSP state president Adv. Sandeep Tajne