समृद्धी महामार्गाजवळ केवळ उद्याेग स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:07 IST2021-06-27T04:07:34+5:302021-06-27T04:07:34+5:30

नागपूर : विदर्भ इंडस्ट्रीज असाेसिएशनच्या अध्यक्षपदावर पुन्हा निवड झालेले सुरेश राठी यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या आसपास केवळ उद्याेग स्थापन ...

Only establish industries near Samrudhi Highway | समृद्धी महामार्गाजवळ केवळ उद्याेग स्थापन करा

समृद्धी महामार्गाजवळ केवळ उद्याेग स्थापन करा

नागपूर : विदर्भ इंडस्ट्रीज असाेसिएशनच्या अध्यक्षपदावर पुन्हा निवड झालेले सुरेश राठी यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या आसपास केवळ उद्याेग स्थापन करण्याला प्राधान्य देण्याचे आवाहन राज्य शासनाला केले आहे.

उद्याेग भवनात झालेल्या व्हीआयएच्या ५७ व्या वार्षिक आमसभेमध्ये सुरेश राठी यांची २०२१-२२ या वर्षासाठी तिसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवड झाली. सचिव पदावर गाैरव सारडा यांची निवड करण्यात झाली. यावेळी बाेलताना राठी यांनी काेराेना काळात विदर्भातील उद्याेगांना संकटातून काढण्यासाठी शक्यताे सर्व प्रयत्न करण्याचा विश्वास त्यांनी दिला. त्यांनी उद्याेजकांना काेराेना प्रतिबंधक नियमांचे कठाेरतेने पालन करण्याचे आवाहन केले. सरकारने समृद्ध महामार्गाच्या जवळ उद्याेजकांना प्राधान्य देण्याचा सल्ला देत त्याच क्षेत्रातील उद्याेगांना प्राधान्य दिले जावे. येथूनच कच्चा माल घेण्यात यावा. राेजगारासाठी स्थानिकांनाच प्राधान्य दिले जावा आणि येथील माल समृद्ध महामार्गाच्या माध्यमातून देशभरात पाेहचला जावा, असे आवाहन राठी यांनी केले. असे झाले तर काेराेनासारख्या स्थितीतून उद्याेगांवरील संकट दूर करता येईल. औद्याेगिक विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात १३ व्या क्रमांकावर आहे. ते ५ व्या स्थानावर आणण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याची गरज राठी यांनी व्यक्त केली. तेव्हाच महाराष्ट्रात ‘इज ऑफ डुइंग बिजनेस’ हाेत आहे, असा विश्वास येईल. व्हीआयएतर्फे या दिशेने सकारात्मक पावले उचलत राहील, असा विश्वास त्यांनी दिला.

व्हीआयएची नवीन टीम

सुरेश राठी : अध्यक्ष

अतुल पांडे : निवर्तमान अध्यक्ष

आर.बी. गोयनका : उपाध्यक्ष

आदित्य सराफ : उपाध्यक्ष

डॉ. सुहास बुधे : उपाध्यक्ष

नरेश जखोटिया : कोषाध्यक्ष

गौरव सारडा : सचिव

अनिता राव : सहसचिव

आशिष दोशी : सहसचिव

कार्यकारिणी सदस्य : हरगोविंद बजाज (मार्गदर्शक), प्रफुल्ल दोशी, सुरेश अग्रवाल, रोहित बजाज, प्रतीक तापड़िया, प्रवीण तापड़िया, गिरधारी मंत्री, सत्यनारायण नुवाल, गिरीश देवधर, विशाल अग्रवाल, पंकज बक्शी, पंकज सारडा, आकाश अग्रवाल, अनिल पारख, रोहित अग्रवाल, राकेश सुराना, असित सिन्हा, हेमंत लोढा, ओ.एस. बगड़िया, प्रशांत कुमार मोहोता, किरीट जोशी, डॉ. प्रशांत अग्रवाल.

Web Title: Only establish industries near Samrudhi Highway