शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

१८ शेतकरी कुटुंबीयांनाच विमा संरक्षणाचा लाभ, अधिका-यांनीच केली कर्तव्यात कसूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:07 IST

जुलै ते आॅक्टोबर या चार महिन्यांच्या कालावधीत विषारी कीटकनाशकांच्या फवारणीमुळे राज्यातील ५१ शेतकरी-शेतमजुरांना आपला जीव गमवावा लागला. या सर्वांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत मिळणे अपेक्षित होते.

नागपूर : जुलै ते आॅक्टोबर या चार महिन्यांच्या कालावधीत विषारी कीटकनाशकांच्या फवारणीमुळे राज्यातील ५१ शेतकरी-शेतमजुरांना आपला जीव गमवावा लागला. या सर्वांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रशासकीय प्रक्रियेचा फटका त्यांना बसला असून केवळ १८ शेतक-यांच्या कुटुंबीयांंनाच विमा संरक्षणाचा लाभ देण्यासाठीचे प्रस्ताव विमा कंपनीकडे दाखल करण्यात आलेले आहे. इतर मृत शेतकरी व शेतमजुरांबाबत शासनाची नेमकी भूमिका तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.धनंजय मुंडे, प्रकाश गजभिये, हेमंत टकले, सुनील तटकरे इत्यादी सदस्यांनी विधान परिषदेत यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान प्रश्न उपस्थित केला होता. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. राज्यातील यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, धुळे या जिल्ह्यांत कापूस व सोयाबीन या पिकांवर जुलै ते आॅक्टोबर या महिन्यात कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली. ही फवारणी करताना ५१ शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाला. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २१ शेतकरी-शेतमजुरांना जीव गमवावा लागला. तर ७८३ जणांना विषबाधा झाली.विषारी कीटकनाशकांमुळे मृत झालेल्या १८ शेतकरी कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांच्या रकमेचा विमा संरक्षणाचा लाभ देण्यासाठी विमा कंपनीकडे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे, असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. मात्र उर्वरित ३३ जणांच्या कुटुंबीयांना कशा प्रकारची आर्थिक मदत करण्यात आली, याची कुठलीही माहिती शासनाने दिलेली नाही.अधिका-यांनीच केली कर्तव्यात कसूरदरम्यान, जुलैपासून कीटकनाशकांच्या दाहकतेचे शेतकºयांना जीवघेणे चटके लागत असल्याची बाब लक्षात आल्यानंतरदेखील अधिका-यांनी शासनाला काहीच कळविले नव्हते, असे आरोप विरोधकांकडून होत होते.

टॅग्स :FarmerशेतकरीNagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७