शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

ऑनलाईन शॉपिंग पडले महागात : फसवणुकीचा अफलातून प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:51 PM

ऑनलाईन खरेदी केलेले टी शर्ट परत करण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीला सायबर ठगाने ९९,९९५ रुपयांचा गंडा घातला. ऑनलाईन खरेदी विक्रीचा व्यवहार कसे जोखमीचे ठरू शकते, त्याचे हे प्रकरण उत्तम उदाहरण आहे. या अफलातून फसवणूक प्रकरणात शांतीनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देटी शर्टमुळे गमावले ९९,९९५ रुपये : शांतीनगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑनलाईन खरेदी केलेले टी शर्ट परत करण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीला सायबर ठगाने ९९,९९५ रुपयांचा गंडा घातला. ऑनलाईन खरेदी विक्रीचा व्यवहार कसे जोखमीचे ठरू शकते, त्याचे हे प्रकरण उत्तम उदाहरण आहे. या अफलातून फसवणूक प्रकरणात शांतीनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.संदीप धरमचंद जैन (वय ४९) हे शांतीनगरातील तुळस अपार्टमेंटमध्ये राहतात. ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून त्यांनी एक टी शर्ट विकत घेतला होता. तो पसंत न पडल्याने त्यांनी हा टी शर्ट परत करण्यासाठी संबंधित क्लब फॅक्टरीचा गुगलवरून संपर्क क्रमांक शोधला. ३१ जानेवारी २०१९ ला रात्री ७.१५ ते ७.२० या वेळेत त्यांनी ७००३९०७७०५ या क्रमांकावर फोन केला. त्या मोबाईलवर बोलणाऱ्या ठगबाजाने जैन यांना टी शर्टची रक्कम कोणत्या खात्यात जमा करायची, अशी विचारणा करून जैन यांच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती मिळवली. त्यांचा ओटीपी नंबरही मिळवला आणि त्या माहितीच्या आधारे ठगबाजाने जैन यांच्या खात्यातून ९९,९९५ रुपये स्पाईस मनी नामक खात्यात वळते करून घेतले. हा प्रकार लक्षात यायला बराच उशीर झाला. आपल्या खात्यातील सुमारे एक लाख रुपये कमी झाल्याचे कळाल्यानंतर जैन यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा त्यांना त्यांच्या बँक खात्याचा यूपीआय अ‍ॅक्टिव्ह करून ही रक्कम वळती करण्यात आल्याचे समजले. एका टी शर्टच्या खरेदीसाठी आणि नंतर ती परत करण्यासाठी ९९,९९५ रुपये गमावलेल्या जैन यांनी शांतीनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सायबर सेलच्या माध्यमातून ठगबाजाचा शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमonlineऑनलाइन