आॅनलाईन सेवा केवळ कागदावरच

By Admin | Updated: August 12, 2016 02:36 IST2016-08-12T02:36:08+5:302016-08-12T02:36:08+5:30

गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी शासनाने सर्व सेवा आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला.

Online service only on paper | आॅनलाईन सेवा केवळ कागदावरच

आॅनलाईन सेवा केवळ कागदावरच

शेतकऱ्यांची लूट :
सातबारासाठी घेतले जात आहेत पैसै
नागपूर : गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी शासनाने सर्व सेवा आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला. प्रशासकीय कारभारही आॅनलाईन झाला. मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. आॅनलाईन सेवा बंद असल्याचे कारण सांगून सातबारासाठी शेतकऱ्यांकडून १०० रुपये घेण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे.
काटोल, नरखेड तालुक्यांतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आॅनलाईन सातबारा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु सातबारासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना आॅनलाईन सेवा बंद असल्याचे सांगण्यात येते. तसेच ‘आॅनलाईन सातबारा पाहिजे असले तर सेवा सुरू झाल्यावर याह्ण असे उत्तर तलाठ्यांकडून दिले जाते. इतर कर्मचारीही यात सहभागी आहेत. आॅनलॉईन सातबारा सेवा सुरू असतानाही बंद असल्याचे सांगण्यात येते. या सातबारासाठी शंभर-शंभर रुपये त्यांच्याकडून घेण्यात येत असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून हा प्रकार सुरू आहे. सातबारासाठी शेतकऱ्यांकडून शंभर रुपये घेण्यात येत असल्याची तक्रार सुद्धा जिल्हा प्रशासला प्राप्त झाल्या आहेत. अधिकारी मात्र आॅनलाईन सेवा सुरू असल्याचे सांगतात. परंतु शेतकऱ्यांना मात्र कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे नेमकी परिस्थिती काय? सेवा सुरू असूनही बंद असल्याचे सांगितले जात असेल तर अशा कर्मचाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Online service only on paper