‘आॅनलाईन लॉटरी’चे दुकान अखेर हटले

By Admin | Updated: June 14, 2014 03:01 IST2014-06-14T03:01:29+5:302014-06-14T03:01:29+5:30

नागपूर विभागाचा संपूर्ण प्रशासकीय कारभार ज्या परिसरातून चालतो त्या सिव्हिल लाईन्समधील...

The 'online lottery' shop was finally removed | ‘आॅनलाईन लॉटरी’चे दुकान अखेर हटले

‘आॅनलाईन लॉटरी’चे दुकान अखेर हटले

नागपूर : नागपूर विभागाचा संपूर्ण प्रशासकीय कारभार ज्या परिसरातून चालतो त्या सिव्हिल लाईन्समधील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरातील जागेत राजरोसपणे

थाटलेले आॅनलाईन लॉटरीचे दुकान शुक्रवारी तातडीने हटविण्यात आले. लोकमतने शुक्रवारी शासकीय कार्यालयांच्या परिसरात आॅनलाईन लॉटरीचे दुकान थाटले’ या

शीर्षकांतर्गत वृत्त प्रकाशित करून या प्रकाराकडे लक्ष वेधण्यात आले होते. प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन सकाळीच कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरातील

किरकोळ विक्रेत्यांमध्ये दिवसभर या कारवाईचीच चर्चा होती.
विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ प्रशासकीय इमारत क्रमांक २ च्या बाजूला दोन खोल्यांचे गाळे काढण्यात आले आहे. या गाळ्यात भोजनालय आणि झेरॉक्स सेंटर

उघडण्यात आले आहे. या झेरॉक्स सेंटरला लागूनच आॅनलाईन लॉटरीचे दुकान थाटण्यात आले होते. दुकानावर लॉटरी सेंटरचा कुठलाही उल्लेख नव्हता. दुकानाच्या

चारही बाजूचा परिसर पोत्यांनी झाकलेला होता. त्यामुळे आत काय सुरू आहे, याची बाहेरच्यांना कल्पनाही येत नव्हती. ज्यांना माहिती होते ते थेट लॉटरी खेळण्यासाठी आत

जायचे. मागील वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता. शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजय लाडवान याना हा प्रकार खटकला. त्यांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली.

परंतु आपल्या अधिकारात ते मोडत नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर ते विभागीय आयुक्तांना भेटले आणि त्यांना सर्व प्रकार सांगितला. परंतु त्यानंतरही कारवाई

झाली नाही. त्यांनी सोशल मीडियावर हा प्रकार शेअर केला. लोकमतने याची दखल घेत यसंबंधात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
शुक्रवारी सकाळी वृत्त वाचताच प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. शासकीय कार्यालये सुरू होण्यापूर्वीच येथील अनधिकृत लॉटरी सेंटरवर कारवाई करण्यात आली.

(प्रतिनिधी)

Web Title: The 'online lottery' shop was finally removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.