नागपुरात ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाईन फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 21:41 IST2020-10-24T21:39:27+5:302020-10-24T21:41:29+5:30
Cyber crime, Online fraud of senior citizens nagpur newsसोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाईन फसवणूक करून २३८०० रुपयांनी लुटले. यासंदर्भात सोनेगाव पोलिसांनी आयटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

नागपुरात ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाईन फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाईन फसवणूक करून २३८०० रुपयांनी लुटले. यासंदर्भात सोनेगाव पोलिसांनी आयटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मार्च महिन्यातील आहे. ६ मार्च रोजी तक्रारकर्त्या ज्येष्ठ नागरिकाला अनोळखी इसमाने फोन करून तुमच्या पेटीएम अकाऊंटच्या केवायसीची मुदत संपली आहे. केवायसी केली नाही तर पेटीएम अकाऊंट बंद होईल, असे सांगून तक्रारकर्त्याच्या खात्याची माहिती घेतली. त्यांच्या खात्यातून २३८०० रुपये लंपास केले. तक्रारकर्त्यास ही बाब लक्षात आल्याने त्यांनी सोनेगाव पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला.