शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘महाज्योती’तर्फे एमएचटी-सीईटी, जेईई, नीटसाठी ऑनलाईन प्रशिक्षण; पात्र विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब

By आनंद डेकाटे | Updated: August 19, 2023 17:30 IST

३१ ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज

नागपूर : राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्यातर्फे २०२५ मध्ये होणाऱ्या एमएचटी-सीईटी, जेईई, नीट या प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना येत्या ३१ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. विषेश म्हणजे, या प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि दर दिवसाला ६ जीबी इंटरनेट डाटा पुरविण्यात येणार आहे. अशी माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिली.

राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती-विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून एमएचटी-सीईटी, जेईई, नीट २०२५ करिता पूर्व प्रशिक्षण योजना लागू आहे. याअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले आहेत. यात राज्यातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यास अर्ज करता येईल. इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती- भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी विद्यार्थी असावा. उमेदवार हा नाॅन क्रिमीलेअर उत्पन्न गटातील असावे. जे विद्यार्थी हे २०२३ मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत ते अर्ज करण्यास पात्र राहतील. पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करताना ११ वी विज्ञान शाखेचे प्रवेश पत्र (बोनाफाईट सर्टिफिकेट) आणि दहावी ची गुणपत्रिकेसह अन्य आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत. विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचे अपेक्षित आहे. 

विद्यार्थ्यांना असा करता येणार अर्ज

महाज्योतीच्या संकेतस्थळावर सूचना फलक (नोटीस बोर्ड) या पर्यायात जाऊन ‘ॲप्लिकेशन फाॅर एमएचटी-सीईटी/जेईई/नीट 2025 ट्रेनिंग’ ला भेट द्यायची आहे. यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार. तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे. अर्ज भरतांना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये म्हणून महाज्योतीतर्फे काॅल सेंटरची सुविधा सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ०७१२-२८७०१२०-२१ या संपर्क क्रमांकावर किंवा इमेल आईडी: महाज्योतीनीट24@जिमेल.काॅम वर आपल्या अर्जातील शंका दूर करता येणार.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी