दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:11 IST2021-05-05T04:11:43+5:302021-05-05T04:11:43+5:30
जलालखेडा : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने आराेपीने एकाला मारहाण करून जखमी केले. शिवाय, आराेपीने शिवीगाळही केली. ही घटना ...

दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण
जलालखेडा : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने आराेपीने एकाला मारहाण करून जखमी केले. शिवाय, आराेपीने शिवीगाळही केली. ही घटना जलालखेडा येथे शनिवारी (दि.१) दुपारच्या सुमारास घडली.
प्रल्हाद विठ्ठलराव राऊत (४२, रा. पुसला, ता. वरूड, ह. मुक्काम रानवाडी, ता. नरखेड) असे जखमीचे नाव असून, पंढरी बन्साेड रा. रानवाडी, ता. नरखेड असे आराेपीचे नाव आहे. प्रल्हाद राऊत हे उमठा-जामगाव राेडवरील कालवा मार्गाने पायी जात असताना, आराेपी तेथे दुचाकीवरून आला व त्यांना दारू पिण्यासाठी २० रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने आराेपीने त्यांना दगडाने डाेक्यावर मारहाण करीत जखमी केले. शिवाय, आराेपीने शिवीगाळ करून ‘पाेलिसात तक्रार केल्यास बग’ अशी धमकीही दिली. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास पाेलीस नाईक प्रजाेक तायडे करीत आहेत.