लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका मुलीसोबत बोलताना दिसल्यामुळे संबंधित व्यक्तीवर नको तो आरोप लावून काही जणांनी त्याच्यावर हल्ला चढवला. त्याला वाचविण्यासाठी त्याचे मेव्हणे आले असता आरोपींनी एकावर तलवारीने वार करून त्याला गंभीर जखमी केले. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरानगर जाटतरोडी भागात रविवारी रात्री ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.इंदिरानगरात राहणारे आशिष सूरदास राऊत (वय ३७) हे रविवारी रात्री जेवण करून सिगारेट घेण्यासाठी चौकात जात असताना इमामवाडा मधील रवी मूर्ती कारखान्याच्या मागे त्यांना ओळखीची मुलगी दिसली. ते तिच्या सोबत बोलत उभे असताना आरोपी सुनील पाहुणे, अंकुश खोब्रागडे, अजय पाहुणे, अतुल घोष, विद्या पाहुणे आणि त्यांचे साथीदार धावून आले. पागल मुलीला घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आहे का, असे विचारून आरोपींनी राऊत यांच्यावर हल्ला चढवला. आरडाओरड ऐकून राऊत यांचे मेहुणे प्रशांत पाटील, मनीष पाटील, अक्षय पाटील, आणि कमलेश पाटील वाद सोडविण्यासाठी आले असता आरोपी अंकुश खोब्रागडे याने मनीष पाटील यांच्यावर तलवारीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तर अन्य आरोपींनी लाकडी दांडे, पाटीने मारहाण करून उपरोक्त चौघांना जखमी केले. आरोपींकडे असलेले शस्त्रे पाहून घाबरलेले पाटील आणि राऊत त्यांच्या घरी गेले असता आरोपी अजय पाहुणे आणि विद्या पाहुणे त्यांच्या घरावर चालून आले. तक्रार दिली किंवा आमचे नाव पोलिसांना सांगितल्यास तुमचे घर जाळून टाकू, अशी धमकी दिली. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. त्यांनी काही आरोपींना ताब्यात घेतले. जखमींना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले असून राऊत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमांनुसार उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
तलवार हल्ल्यात एक गंभीर जखमी : नागपुरातील इंदिरानगरात तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 19:52 IST
एका मुलीसोबत बोलताना दिसल्यामुळे संबंधित व्यक्तीवर नको तो आरोप लावून काही जणांनी त्याच्यावर हल्ला चढवला. त्याला वाचविण्यासाठी त्याचे मेव्हणे आले असता आरोपींनी एकावर तलवारीने वार करून त्याला गंभीर जखमी केले.
तलवार हल्ल्यात एक गंभीर जखमी : नागपुरातील इंदिरानगरात तणाव
ठळक मुद्देइमामवाड्यात गुन्हा दाखल