शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
3
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
4
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
5
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
6
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
7
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
8
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
9
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
10
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
11
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
12
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
13
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
14
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
15
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
16
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
17
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
18
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
19
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
20
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

नागपुरातील वाठोड्यात एकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 11:47 PM

वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने शुक्रवारी सकाळी आराधनानगर आणि आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली.

ठळक मुद्देमारेकऱ्यांसह मृतही अनोळखी : पोलिसांची शोधाशोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने शुक्रवारी सकाळी आराधनानगर आणि आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्ती कोण, कुठला ते रात्रीपर्यंत स्पष्ट झाले नाही. मात्र, त्याची हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे आहे. बिडगाव आऊटर रिंग रोड, आराधनानगरच्या पांदण रस्त्यावर त्याचा मृतदेह पडून असल्याचे शुक्रवारी सकाळी या भागातील लोकांना दिसले. त्यामुळे एकाने नियंत्रण कक्षात फोन करून कळविले. नियंत्रण कक्षाने वाठोडा पोलिसांना सांगताच पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. मृताच्या डोक्यावर, कपाळावर रॉड किंवा लोखंडी पाईपने फटके मारून त्याची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला. मृताची ओळख पटविण्यासाठी आजूबाजूच्यांना पोलिसांनी विचारणा केली. मात्र, ओळख पटेल अशी कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. मृत व्यक्तीच्या कपड्यात एकही कागद, मोबाईल अथवा रुपया आढळला नाही. चप्पलही त्याच्या पायात नव्हती. पेहराव्यावरून तो मजूर असावा, त्याला पूर्व वैमनस्यातून या ठिकाणी आणून मारले असावे आणि ओळख पटू नये म्हणून त्याच्या खिशातील कागद, पैसे तसेच मोबाईल पळवून नेला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. वाठोडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. या भागातील मजुरांच्या झोपड्यांवर विचारपूस करून तसेच विविध पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या बेपत्ता व्यक्तींची माहिती मिळवून त्याआधारे मृताची ओळख पटविण्याचे पोलीस प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून