मानकापूर उड्डाणपुलाचा सुधार करण्यासाठी एक महिन्याची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:22 IST2020-12-04T04:22:04+5:302020-12-04T04:22:04+5:30
नागपूर : मानकापूर चौकातील फ्लायओव्हरचा काही भाग कमजोर झाला आहे. या पुलावरील रस्त्याचा काही भाग तोडून बनविण्यात येत ...

मानकापूर उड्डाणपुलाचा सुधार करण्यासाठी एक महिन्याची मुदत
नागपूर : मानकापूर चौकातील फ्लायओव्हरचा काही भाग कमजोर झाला आहे. या पुलावरील रस्त्याचा काही भाग तोडून बनविण्यात येत आहे. या कामासाठी कंत्राटदार कंपनीला दोन महिन्याचा वेळ हवा आहे. परंतु वाहतूक पोलीस उपायुक्तांनी एक महिन्यात काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. एनएचएआयने दरवर्षीप्रमाणे मान्सूनच्या पूर्वी व नंतर पुलाची टेस्टिंग केली. मानकापूर फ्लायओव्हरमध्ये काही त्रुटी निदर्शनास आल्या. पुलावरील काही भागात भेगा पडल्या आहे. लोखंड गंजलेले आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी पुलावरील काही भागात डायव्हर्शन लावले आहे. वाहनांच्या आवागमनामुळे कामात अडथळे येत आहेत. त्यामुळे कंत्राटदार कंपनी हे काम महिनाभरात करू शकणार नाही. वाहतूक उपायुक्तांनी दिलेला अवधी १० डिसेंबर रोजी संपणारा आहे. अजून बरेच काम बाकी आहे. त्यामुळे एनएचआय दोन महिन्याचा अतिरिक्त वेळ मागण्याच्या तयारीत आहे.