वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:08 IST2021-03-22T04:08:43+5:302021-03-22T04:08:43+5:30

बुटीबाेरी : अज्ञात भरधाव वाहनाने रस्ता ओलांडताना जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही ...

One killed in vehicle crash | वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

बुटीबाेरी : अज्ञात भरधाव वाहनाने रस्ता ओलांडताना जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाेरखेडी टाेलनाका परिसरात शुक्रवारी (दि.१९) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

ज्ञानेश्वर वामनराव काेल्हे असे मृताचे नाव असून, ताे फिर्यादी प्रवीण भास्करराव वरघणे (४७, रा. वाॅर्ड क्र.३, बुटीबाेरी) यांच्या शेतात सालगडी म्हणून कामाला हाेता. घटनेच्या दिवशी ज्ञानेश्वर आठवडी बाजारात खरेदीसाठी गेला हाेता. दरम्यान बाेरखेडीजवळ नागपूर-चंद्रपूर महामार्ग ओलांडून घराकडे जात असताना, अज्ञात भरधाव वाहनचालकाने ज्ञानेश्वरला मागून जाेरात धडक दिली. त्यात डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि कलम २७९, ३०४ (अ), सहकलम १८४, १३४, १७७ माेटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस निरीक्षक काेकाटे करीत आहेत.

Web Title: One killed in vehicle crash