नागपूर जिल्ह्यात दोन बाईकच्या अपघातात एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 11:34 AM2021-01-22T11:34:54+5:302021-01-22T11:35:14+5:30

Nagpur News  नांद लगतच्या पांजरेपार पूलावरिल वळणावर नांद- भिवापूर मार्गांवर शुक्रवारी (दि.22) सकाळी 9 वाजताच्या दरम्यानच्या दोन मोटारसायकल आपसात भिडल्या. यात एकाचा जागेवर मृत्यु झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. 

One killed, three injured in two bike accidents in Nagpur district |  नागपूर जिल्ह्यात दोन बाईकच्या अपघातात एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

 नागपूर जिल्ह्यात दोन बाईकच्या अपघातात एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क  
    नागपूर :  नांद लगतच्या पांजरेपार पूलावरिल वळणावर नांद- भिवापूर मार्गांवर शुक्रवारी (दि.22) सकाळी 9 वाजताच्या दरम्यानच्या दोन मोटारसायकल आपसात भिडल्या. यात एकाचा जागेवर मृत्यु झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. 
     महादेव चौरे (५५) रा.झ मकोली असे मृताचे नाव आहे .तर सुनिल घनश्याम शेंन्डे३५, प्रदिप घनश्याम शेंन्डे ४० दोघेही रा.चिखलापार ता. भिवापूर असे गंभीर जखमींचे नावे आहेत.
    सकाळी MH- 40-Q-9905 क्रमांकाच्या बाईकने दोघेही भाऊ नांदला काही कामानिमित्याने जात असताना नांद कडून MH-31-Q-998 क्रमांकाच्या मोटरसायकल वरून माहादेव चौरे किराणा सामान घेऊन झमकोली गावाला जात होता.काही अंररावर पांजरेपार फाट्यावरील पुलाच्या वळणावर दोन्ही मोटासायल आपसात भिडल्या. अपघात एवढा जबरदस्त होता कि दोन्ही मोटारसायकलचा चुराडा झाला. त्यात महादेव चौरेच्या डोक्यात मोटारसायकलचा फुटरेस घुसल्याने तो जागीच मृत्यू पावला.

    हा अपघात झाला तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांनी मोठा ऐकून  घटनास्थळी धाव घेतली. नांद चौकीतील पोलीसांना या अपघाताची सुचना दिली. लगेच नांद चौकीत तैनात असलेले पोलीस उमेश झिंगरे, नागेश वाघाडे बाबाराब राठोड यांनी घटनास्थळ गाठले.  पोलिसांनी  पंचनामा करून जखमींना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रवाना करून मृतकला भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
     पुढील तपास ठाणेदार महेश भोरटेकर यांचे मार्गदर्शनखाली प्रकाश आलाम व कर्मचारी करीत आहे.

Web Title: One killed, three injured in two bike accidents in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात