अपघातात पतीसह एक ठार, पत्नी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:11 IST2021-06-16T04:11:29+5:302021-06-16T04:11:29+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : वळणावर रस्ता क्राॅस करताना भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील पती व ...

One killed along with husband in accident, wife injured | अपघातात पतीसह एक ठार, पत्नी जखमी

अपघातात पतीसह एक ठार, पत्नी जखमी

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापा : वळणावर रस्ता क्राॅस करताना भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील पती व अन्य एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर-खापा मार्गावरील काेदेगाव (ता. सावनेर) शिवारात साेमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

किसना दुधकवडे (४५, रा. पानउबाळी, ता. कळमेश्वर) व प्रकाश बोरीवार (२२, रा. कान्हादेवी, ता. सावनेर) अशी मृतांची तर शशिकला किसना दुधकवडे (रा. पानउबाळी, ता. कळमेश्वर) असे गंभीर जखमीचे नाव आहे. तिघेही पारशिवनी तालुक्यात त्यांच्या नातेवाईकाकडे लग्नासाठी गेले हाेते. तिघेही एमएच-४०/बीआर-३०५७ क्रमांकाच्या दुचाकीने ट्रिपल सीट पारशिवनी तालुक्यातून खापामार्गे पानउबाळीला परत जात हाेते.

दरम्यान, काेदेगाव शिवारातील वळणावर काेदेगाव येथून वेगात आलेल्या एमएच-३१/बीई-८४१० क्रमांकाच्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने किसना व प्रकाशचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर शशिकला गंभीर जखमी झाली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तर शशिकलाला उपचरासाठी खापा येथील शासकीय रुग्णालयात आणले. पाेलीस घटनास्थळी दाखल हाेईपर्यंत ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टर साेडून पळ काढला हाेता. याप्रकरणी खापा पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे करीत आहेत.

Web Title: One killed along with husband in accident, wife injured