शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

काँग्रेसचा एक गट दिल्लीत दुसरा नागपुरात सक्रिय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:07 IST

माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांचा गट आपल्या समर्थकांसह दिल्लीत डेरेदाखल झाला आहे. दोन दिवसात त्यांनी काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मोतीलाल व्होरा व मुकुल वासनिक आदींच्या भेटी घेतल्या. हा गट दिल्लीत पोहचल्याने काँग्रेसमधील दुसरा गट शहरात सक्रिय झाला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी करीत असताना नागपुरात काँग्रेसचे नेते आपसात लढत असतील तर पक्षाला विजय कसा मिळेल, असा प्रश्न काँग्रेस विचाराच्या मतदारांना पडला आहे.

ठळक मुद्देकसा होणार काँग्रेसचा विजय?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांचा गट आपल्या समर्थकांसह दिल्लीत डेरेदाखल झाला आहे. दोन दिवसात त्यांनी काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मोतीलाल व्होरा व मुकुल वासनिक आदींच्या भेटी घेतल्या. हा गट दिल्लीत पोहचल्याने काँग्रेसमधील दुसरा गट शहरात सक्रिय झाला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी करीत असताना नागपुरात काँग्रेसचे नेते आपसात लढत असतील तर पक्षाला विजय कसा मिळेल, असा प्रश्न काँग्रेस विचाराच्या मतदारांना पडला आहे.महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वात व माजी पक्षनेता यशवंत कुंभलकर यांच्या अध्यक्षतेखाली या गटाची मंगळवारी आमदार निवास येथे बैठक झाली. यात मुत्तेमवार व ठाकरे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविण्याचा निर्णय घेण्यात आला.नागपूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसची उमेदवारी माजी मंत्री नितीन राऊ त, सतीश चतुर्वेदी, प्रफुल्ल गुडधे, माजी खासदार गेव्ह आवारी वा माजी आमदार अशोक धवड यांना देण्यात यावी. सतीश चतुर्वेदी यांना पुन्हा काँग्रेस पक्षात घेण्यात यावे, शहर काँगे्रस अध्यक्षांना बदलविण्यात यावे. अशा आशयाचे ठराव या बैठकीत पारित करण्यात आल्याची माहिती तानाजी वनवे यांनी दिली.यावेळी माजी नगरसेवक अरुण डवरे, कांता पराते, कमलेश समर्थ, नगरसेवक किशोर जिचकार, सुभाष खोडे, विजय बाभरे, संजय दुबे, आशया उईके, राजेश जरगर, मन्सूरखान, सतीश पाली, विनायक पौनीकर, देवराव तिजारे यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित असल्याची माहिती वनवे यांनी दिली.शहर काँग्रेसच्या मतानुसार उमेदवार ठरावाशहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात दिल्लीत दाखल झालेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व ए.के.अ‍ॅन्थोनी यांची तर मंगळवारी काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मोतीलाल व्होरा व मुकुल वासनिक आदींच्या भेटी घेऊन नागपूर लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या उमेदवार शहर काँगे्रस कमिटीच्या मताने ठरविला जावा,अशी मागणी केली. दिल्लीतील शिष्टमंडळ बुधवारीही काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेणार असून सायंकाळी नागपूरला परतणार आहे.बडतर्फ चतुर्वेदी यांना उमेदवारी द्याआमदार निवास येथील बैठकीत काँग्रेसच्या दुसऱ्या गटाने नागपुरात काँग्रेसची उमेदवारी नितीन राऊ त, प्रफुल्ल गुडधे,गेव्ह आवारी,अशोक धवड वा सतीश चतुर्वेदी यांना देण्यात यावी, अशा आशयाचा ठराव पारित केला. विशेष म्हणजे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यावरील शाई फेक प्रकरणात सतीश चतुर्वेदी यांना काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आलेले आहे. असे असतानाही तानाजी वनवे यांनी चतुर्वेदी यांना उमेदवारी मिळावी. अशा मागणी ठरावाच्या माध्यमातून केली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण