अपघातात एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:18 IST2021-01-13T04:18:40+5:302021-01-13T04:18:40+5:30
खापा : भरधाव दुचाकी स्लीप झाल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खापा (ता. सावनेर) पाेलीस ...

अपघातात एकाचा मृत्यू
खापा : भरधाव दुचाकी स्लीप झाल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील टेंभूरडाेह फाटा परिसरात नुकतीच घडली.
वसंता ज्ञानबा माेहतुरे (५३, रा. सिराेंजी, ता. सावनेर) असे मृताचे नाव आहे. ते अंबादास रामचंद्र बगमार (३५, रा. सर्रा, ता. सावनेर) याच्या एमएच-४०/बीटी-६२१९ क्रमांकाच्या दुचाकीवर मागे बसून जात हाेते. अंबादास दुचाकी चालवीत हाेता. दरम्यान, टेंभूरडाेह फाटा परिसरात त्याचा ताबा सुटल्याने वेगात असलेली दुचाकी स्लीप झाली आणि दाेघेही काेसळले. त्यात वसंताला गंभीर दुखापत झाल्याने नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी खापा पाेलिसांनी भादंवि २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक फाैजदार दीपक मानवटकर करीत आहेत.