कारच्या धडकेमुळे एकाचा मृत्यू
By Admin | Updated: July 14, 2014 03:00 IST2014-07-14T03:00:57+5:302014-07-14T03:00:57+5:30
रस्ता ओलांडून लघुशंकेसाठी जाणाऱ्या ६५ वर्षाच्या व्यक्तीला

कारच्या धडकेमुळे एकाचा मृत्यू
नागपूर : रस्ता ओलांडून लघुशंकेसाठी जाणाऱ्या ६५ वर्षाच्या व्यक्तीला एका कारचालकाने धडक देऊन गंभीर जखमी केले आणि तो घटनास्थळावरून फरार झाला. दरम्यान मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाल्याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी आरोपी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नरेश बळीराम वाघधरे (६५) रा. नवीन बगडगंज, लकडगंज पोलीस ठाण्याच्या शेजारी आंबेडकर पुतळ््याजवळ असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते शनिवारी रात्री ११.४५ वाजता लकडगंज पोलीस ठाणे ते सुनील हॉटेल चौकादरम्यान मॅजिस्टीक लिंकच्या विरुद्ध बाजूला रस्ता ओलांडत होते. तेवढ्यात कार क्रमांक ७८०२ च्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून त्यांना धडक देऊन गंभीर जखमी केले. त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी ६ वाजता त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी आरोपी कारचालकाविरुद्ध २७९, ३३७, ३०४ (अ) सहकलम १३४, १७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)