नागपुरात एक कोटीची सडकी सुपारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 19:52 IST2020-06-20T19:48:34+5:302020-06-20T19:52:05+5:30

वडधामना येथील इंडो आर्य सेंट्रलच्या गोडाऊनवर धाड टाकून अन्न व औैषध प्रशासन विभागाच्या पथकाने १ कोटी १ लाख ४७ हजार ६०३ रुपयाची ३९ हजार २१३ किलो सडकी सुपारी जप्त केली.

One crore street betel nuts seized in Nagpur | नागपुरात एक कोटीची सडकी सुपारी जप्त

नागपुरात एक कोटीची सडकी सुपारी जप्त

ठळक मुद्देवडधामना येथील गोडाऊनवर धाड : अन्न व औैषध प्रशासन विभागाची कारवाई


लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर (वाडी) : वडधामना येथील इंडो आर्य सेंट्रलच्या गोडाऊनवर धाड टाकून अन्न व औैषध प्रशासन विभागाच्या पथकाने १ कोटी १ लाख ४७ हजार ६०३ रुपयाची ३९ हजार २१३ किलो सडकी सुपारी जप्त केली. ही कारवाई गुरुवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून शुक्रवाररी पहाटे दुपारी ३ वाजता पर्यंत सुरु राहिली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार व्यापक उपायोजना करीत असताना काही व्यापारी लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे.
संबंधित गोडाऊनमधून सडकी सुपारी व्यापाऱ्यांना पुरविली जाणार असल्याची माहिती अन्न व औैषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. दक्षता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी नीलेश विशे, मिलिंद महागडे, राहुल ताकोटे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पथको गोदाम सील करण्यात आली. तपासाकरिता सुपारी पाठविण्यात आली आहे.

Web Title: One crore street betel nuts seized in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.