आजाराला कंटाळून एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:18 IST2021-01-13T04:18:36+5:302021-01-13T04:18:36+5:30
केळवद : आजारपणाच्या त्रासाला कंटाळून एकाने घरी दाेरीच्या मदतीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना केळवद (ता. सावनेर) पाेलीस ...

आजाराला कंटाळून एकाची आत्महत्या
केळवद : आजारपणाच्या त्रासाला कंटाळून एकाने घरी दाेरीच्या मदतीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना केळवद (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी येथे शुक्रवारी (दि. ८) सकाळी घडली.
विनाेद नामदेव मानकर (४०, रा. उमरी, ता. सावनेर) असे मृताचे नाव आहे. विनाेद दाेन वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त हाेता. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने उपचार घेणेही त्याला शक्य हाेत नव्हते. सतत पाेट दुखत असल्याने ताे त्रासला हाेता. त्यातच शुक्रवारी सकाळी घरी कुणीही नसताना त्याने खाेलीत छताला दाेरीच्या मदतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांना पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्त्रीय तपासणीसाठी सावनेर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलीस हवालदार रामराव पवार करीत आहेत.