पैशाच्या वादातून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST2021-06-02T04:08:14+5:302021-06-02T04:08:14+5:30

मनाेज चुन्नीलाल पिपलवार (३८, रा. अमिनानगर, वाॅर्ड क्र. ५, देवलापार) असे जखमीचे नाव असून, प्रवीण ऊर्फ गाेलू कुजिलाल (३५, ...

One beaten up over a money dispute | पैशाच्या वादातून एकास मारहाण

पैशाच्या वादातून एकास मारहाण

मनाेज चुन्नीलाल पिपलवार (३८, रा. अमिनानगर, वाॅर्ड क्र. ५, देवलापार) असे जखमीचे नाव असून, प्रवीण ऊर्फ गाेलू कुजिलाल (३५, रा. बेलदा वाॅर्ड क्र. ३, देवलापार) असे आराेपीचे नाव आहे. जखमी मनाेज व त्याचा भाऊ आराेपीच्या घरी त्याचे जुने पैसे देण्यासाठी गेले हाेते. आराेपीच्या वडिलांना पैसे देऊन घरी परत येत असताना, आराेपीने ‘तू पैसे १५ हजारच का दिले, २३ हजार द्यायचे हाेते’ असे म्हणत आराेपीने मनाेजला शिवीगाळ करीत हाताबुक्कीने मारहाण केली. त्यानंतर आराेपीने राेडवर पडलेला दगड घेऊन मनाेजच्या डाेक्यावर मारून जखमी केले. शिवाय, आराेपीने मनाेजच्या भावाला धक्काबुक्की केली. याप्रकरणी मनाेज पिपलवार यांच्या तक्रारीवरून देवलापार पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३२४, ५०४ अन्वये गुन्हा नाेंदविला. पाेलिसांनी आराेपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची सूचनापत्रावर सुटका करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास नाईक पाेलीस राकेश नालगुडवार करीत आहेत.

Web Title: One beaten up over a money dispute