एकास मारहाण, चाैघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:10 IST2021-02-09T04:10:27+5:302021-02-09T04:10:27+5:30
टाकळघाट : आराेपी दुचाकीस्वाराने एका व्यक्तीला कट मारला. यावरून त्यांच्यात वाद झाला. त्या वादातून आराेपीसह चाैघांनी एकास मारहाण करीत ...

एकास मारहाण, चाैघे अटकेत
टाकळघाट : आराेपी दुचाकीस्वाराने एका व्यक्तीला कट मारला. यावरून त्यांच्यात वाद झाला. त्या वादातून आराेपीसह चाैघांनी एकास मारहाण करीत जखमी केले. दरम्यान, पाेलिसांनी आराेपींविरुद्ध गुन्हा नाेंदवून चाैघांना अटक केली आहे. ही घटना एमआयडीसी बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळघाट बसस्टॅण्ड परिसरात शनिवारी (दि. ६) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
संकेत पालीवाल (रा. टेंभरी), सूरज राॅय, रशिद खान व अभिषेक चाैधरी (तिघेही रा. वटेघाट) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. जखमीचे नाव सांगण्यास पाेलिसांनी नकार दिला. आराेपी संकेत पालीवाल याने आपल्या दुचाकीने जखमी व्यक्तीला कट मारला. यावरून त्यांच्यात वादविवाद झाला. या वादातून आराेपीसह अन्य तिघांनी फिर्यादीला हाॅकी स्टिक व चाकूने वार करून जखमी केले. या प्रकरणी एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि कलम ३२६, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, चाैघांना अटक केली आहे. पुढील तपास पाेलीस हवालदार प्रमाेद बन्साेड करीत आहेत.