दीड किलाे गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:19 IST2021-01-13T04:19:33+5:302021-01-13T04:19:33+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : नागपूर शहर पाेलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने कामठी शहरात केलेल्या कारवाईमध्ये अवैध गांजा विक्रेत्यास ...

दीड किलाे गांजा जप्त
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : नागपूर शहर पाेलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने कामठी शहरात केलेल्या कारवाईमध्ये अवैध गांजा विक्रेत्यास अटक केली. त्याच्याकडून १ किलाे ४२६ ग्रॅम गांजा, दारूच्या बाटल्या आणि माेटरसायकल असा एकूण १ लाख ३ हजार २८७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. ९) मध्यरात्री करण्यात आली.
करण सुधाकृष्ण टोटलवार (२२, रा. मच्छीपूल, शास्त्री मंच, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. करण कामठी शहरातील विविध भागात गांजा विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेतील पाेलीस अधिकाऱ्यांना मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी आधी करणच्या घराच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी केली. मिळालेल्या माहितीत सत्यता आढळून येताच गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री त्याच्या घरी धाड टाकली.
घराच्या झडतीदरम्यान पथकाने २१ हजार ३९० रुपये किमतीचा १ किलाे ४२६ ग्रॅम गांजा, एमएच-४०/बीआर-६३०१ क्रमांकाची माेटरसायकल, माेबाईल हॅण्डसेट, विदेशी दारूच्या सात बाटल्या, देशीदारूच्या आठ बाटल्या व सीसीटीव्ही कॅमेरे असा एकूण १ लाख ३ हजार २८७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे हेड काॅन्स्टेबल प्रदीप पवार यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.