पोलिसांच्या धर्तीवर आता आरटीओकडेही ‘बॉडी कॅम’; राज्यातील पहिला प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2023 08:43 PM2023-04-06T20:43:51+5:302023-04-06T20:44:41+5:30

Nagpur News जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्यादृष्टीने पोलिसांच्या धर्तीवर आता प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीणने ‘बॉडी कॅ म’ म्हणजे ‘शरीर कॅमेरा’ खरेदी केले आहे.

On the lines of the police, now the RTO also has 'body cam'; First experiment in the state | पोलिसांच्या धर्तीवर आता आरटीओकडेही ‘बॉडी कॅम’; राज्यातील पहिला प्रयोग

पोलिसांच्या धर्तीवर आता आरटीओकडेही ‘बॉडी कॅम’; राज्यातील पहिला प्रयोग

googlenewsNext


सुमेध वाघमारे
नागपूर : जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्यादृष्टीने पोलिसांच्या धर्तीवर आता प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीणने ‘बॉडी कॅ म’ म्हणजे ‘शरीर कॅमेरा’ खरेदी केले आहे. या कॅमेराचा उपयोग समृद्धी महामार्गावर कार्यरत असलेले तपासणी पथक करणार आहे. 


  समृद्धी महामार्गावर वाहनांची तपासणी करताना आरटीओच्या वायुवेग पथकाला विविध समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकदा वाहनचालक गैरवर्तवणूक करतात. ते रोखण्यासाठी आणि त्याचा पुरावा उपलब्ध करण्यासाठी नागपूर ग्रामीण ‘आरटीओ’ तुर्तास दोन ‘बॉडी कॅम’ विकत घेतले आहे. हा कॅमेरा समृध्दी महामार्गावरिल पथकातील अधिकारी आपल्या शरिरावर दर्शनीभागात लावून वाहनांची तपासणी करतील. ते वाहन चालकांस रस्ता सुरक्षाबाबत व समृध्दी महामार्गावर वाहनांच्या स्थितीबाबत नियमांबाबत समुपदेशन करतील. वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन केल्या गेल्यास ‘बॉडी कॅम’मध्ये त्याचे रेकॉर्र्डिंग होईल. अशा वाहनांवर कठोर कारवाई करण्यास सोईचे होईल. 


-‘बॉडी कॅम’ लावून वाहन तपासणी
प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले, समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी ‘आरटीओ’कडून विविध उपाययोजना हाती घेतल्या जात आहे. यात चालकांचे समुपदेशन करण्यासोबतच दोषी वाहनांवर कारवाई केली जात आहे. ‘बॉडी कॅम’चा उपयोग राज्यात पहिल्यांदाच नागपूर ग्रामीण आरटीओ करीत आहे. यामुळे अपघात रोखण्यास मदत होईल.

Web Title: On the lines of the police, now the RTO also has 'body cam'; First experiment in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.