शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
2
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
3
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
4
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
5
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
6
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
7
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
8
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
9
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
10
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
11
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
12
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
13
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
14
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
15
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
16
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
17
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
18
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
19
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
20
प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
Daily Top 2Weekly Top 5

Driving License Test: ड्रायव्हिंग लायसन्ससाठी होणार ऑन-कॅमेरा टेस्ट ; अपात्र चालकांना बसेल आळा !

By सुमेध वाघमार | Updated: December 4, 2025 17:12 IST

Nagpur : ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे आता खऱ्या अर्थाने ‘कठोर परीक्षेची’ कसोटी ठरणार आहे. परिवहन आयुक्तांच्या नव्या निदेर्शांनुसार आरटीओमध्ये घेतली जाणारी ड्रायव्हिंग टेस्ट आता ठराविक वेळेत, कॅमेऱ्यांच्या नजरेखाली आणि अधिक पारदर्शक पद्धतीने होणार आहे.

नागपूर :ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे आता खऱ्या अर्थाने ‘कठोर परीक्षेची’ कसोटी ठरणार आहे. परिवहन आयुक्तांच्या नव्या निदेर्शांनुसार आरटीओमध्ये घेतली जाणारी ड्रायव्हिंग टेस्ट आता ठराविक वेळेत, कॅमेऱ्यांच्या नजरेखाली आणि अधिक पारदर्शक पद्धतीने होणार आहे. कठोर वेळापत्रक, ऑन-कॅमेरा टेस्ट आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून पास झालेल्यांची पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे. या सर्वामुळे अपात्र चालकांना आळा बसेल, तर रस्त्यांवर अधिक सक्षम व जबाबदार वाहनचालक उतरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  रस्त्यावर होणाऱ्या अपघातांपैकी सुमारे ८० टक्के पेक्षा अधिक अपघात हे वाहन चालकाच्या बेफिकीर वृत्ती व निष्काळजीपणामुळे होतात. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी योग्य चालकांनाच वाहन परवाना मिळावा (ड्रायव्हिंग लायसन्स) या हेतुने परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी आरटीओतील गुणवत्तापूर्ण ‘ड्रायव्हिंग टेस्ट’बाबतचे निकष तयार केले आहेत. त्या संदर्भाचे पत्र ३ डिसेंबर रोजी सर्व आरटीओला देण्यात आले आहे. यात दुचाकीसाठी ५ मिनीट, कारसाठी ७ मिनीट तर अवजड वाहनांसाठी १० मिनीटांचा कालावधी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही टेस्ट ‘ऑन-कॅमेरा’ होणार आहे. एवढेच नाही तर ड्रायव्हिंग टेस्टमध्ये १० टक्केच उमेदवार नापास झाल्यास प्रादेशिक परिवहन अधिकारी किंवा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी पास झालेल्या उमेदवाराची  स्वत:हून टेस्ट घेण्याचा सूचनाही दिल्या आहेत. नियमांचा भंग करणाऱ्या अधिकाऱ्यांविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयास प्रस्ताव सादर करण्याचेही पत्रात निर्देश दिले आहेत. 

ही आहे नियमावली

  • प्रत्येक ड्रायव्हिंग टेस्ट कॅमेऱ्याच्या निगराणीत घ्यावी.
  • टेस्टच्या आदल्यादिवशी ड्रायव्हिंग टेस्ट देणाऱ्या उमेदवारांची प्रिंट काढून कोणता निरीक्षक किती ड्रायव्हिंग टेस्ट घेणार याची यादी तयार करून ती दुसऱ्या दिवशी दर्शनी ठिकाणी लावावी.
  • ड्रायव्हिंग स्कुलमार्फत येणाऱ्या उमेदवाराची चाचणी संबंधित ड्रायव्हिंग स्कुलच्या वाहनावर घ्यावी. चाचणीपूर्वी वाहनाच्या कागदपत्रांची तपासणी करावी
  • ड्रायव्हिंग टेस्टनंतर निरीक्षकांनी अंतिम मान्यतेचे काम विहित कालावधीत संगणकावर करावे. 
  • ड्रायव्हिंग टेस्ट परिसरात ३० दिवसांच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे.

 

वेळेचं बंधन 

दुचाकी आणि तीन चाकी वाहने: ५ मिनिटे ड्रायव्हिंग टेस्टकार आणि मध्यम चारचाकी वाहने: ७ मिनिटे ड्रायव्हिंग टेस्टअवजड वाहने: १० मिनिटे ड्रायव्हिंग टेस्ट

English
हिंदी सारांश
Web Title : On-camera driving tests to curb unqualified drivers: New rules enforced.

Web Summary : Maharashtra RTO introduces mandatory on-camera driving tests, stricter evaluation timings. Repeat tests for suspect passes. Aim: reduce accidents, ensure skilled, responsible drivers get licenses.
टॅग्स :nagpurनागपूरtraffic policeवाहतूक पोलीसDriving Licenseड्रायव्हिंग लायसन्स