कळमन्यात वृद्धाचा खून

By Admin | Updated: June 20, 2014 01:05 IST2014-06-20T01:05:26+5:302014-06-20T01:05:26+5:30

कळमना मार्केटच्या बसस्थानकात आज सकाळी एका वृध्दाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने परिसरात थरार निर्माण झाला. अक्तू पुनाराम शाहू (वय ६५) असे मृताचे नाव आहे.

Older blood in kamman | कळमन्यात वृद्धाचा खून

कळमन्यात वृद्धाचा खून

आरोपी अज्ञात : परिसरात थरार
नागपूर : कळमना मार्केटच्या बसस्थानकात आज सकाळी एका वृध्दाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने परिसरात थरार निर्माण झाला. अक्तू पुनाराम शाहू (वय ६५) असे मृताचे नाव आहे. त्याचा परिवार गुलमोहोरनगरातील पटले किराणा स्टोर्सजवळ श्रावण शाहू यांच्या घरी भाड्याने राहातो.
कळमना मार्केटच्या गेट नंबर २ जवळ बसथांबा आहे. बस थांब्याच्या शेडमध्ये आज सकाळी १० च्या सुमारास अक्तू शाहूंचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमली. अक्तूचा मुलगा आनंद कळमना मार्केटमध्ये चहा टपरी लावतो. माहिती कळताच तो घटनास्थळी पोहचला. वडिलाच्या चेह-यावर आणि पोटावर धारदार शस्त्राचे घाव होते. त्याने पोलिसांना कळविले. ठाणेदार सत्यवीर बंडीवार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धावले. माहिती कळताच पोलीस उपायुक्त संजय दराडे हेदेखिल घटनास्थळी पोहचले.
त्यांनी मृतदेहाची पाहाणी केल्यानंतर मृताच्या मुलांकडे चौकशी केली. वडिलांसोबत बुधवारी रात्री ८ वाजता आपले बोलणे झाले होते. त्यांना जेवायला घरी चलण्यास सांगितले.
त्यांनी नंतर येतो, असे सांगितल्यानंतर आपण निघून गेलो, त्यानंतर आज सकाळी ही घटना उघड झाल्याचे त्यांनी म्हटले. कळमना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, वृद्ध अक्तूचा खून कुणी आणि कशासाठी केला असावा, त्याचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Older blood in kamman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.