मारहाणीत वृद्ध जबर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:07 IST2021-05-24T04:07:05+5:302021-05-24T04:07:05+5:30
नागपूर : शेजाऱ्याने किरकोळ कारणावरून लाकडी दांडक्याने मारहाण केल्यामुळे एक वृद्ध जबर जखमी झाला. भाऊराव रामचंद्र उके (वय ६८) ...

मारहाणीत वृद्ध जबर जखमी
नागपूर : शेजाऱ्याने किरकोळ कारणावरून लाकडी दांडक्याने मारहाण केल्यामुळे एक वृद्ध जबर जखमी झाला. भाऊराव रामचंद्र उके (वय ६८) असे जखमी वृद्धाचे नाव आहे.
सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गड्डीगोदाम चौकाजवळ उके राहतात. त्यांच्या वस्तीत राहणाऱ्या वालदे नामक इसमाने शनिवारी रात्री ७ च्या सुमारास उके यांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले असून, त्यांनी दिलेल्या जबाबावरून सदर पोलिसांनी आरोपी वालदे नामक इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
---
सीताबर्डी येथील वृद्धा बेपत्ता
नागपूर : सीताबर्डी येथील हनुमान गल्ली झेंड्याजवळ राहणाऱ्या कमल ऊर्फ बेबी बालाजी रोहणकर (वय ६२) या शनिवारी सकाळी ८ वाजेपासून बेपत्ता झाल्या. त्यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी मिसिंगची नोंद केली. त्यांचा शोध घेतला जात आहे.
---