शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

अबब ! रद्द तिकिटांमधून रेल्वेला सव्वातीन हजार कोटींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:16 IST

एप्रिल २०१९ पासून अवघ्या सहा महिन्यात देशभरात साडेतीन कोटींहून अधिक तिकिटे रद्द झाली व त्यातून थोडाथोडका नव्हे तर ३ हजार ४२० कोटींहून अधिकचा महसूल जमा झाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे६ महिन्यांची आकडेवारी : एकूण तिकीट खरेदीतून १७ हजार कोटींची कमाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेकदा अगोदर आरक्षित केलेली तिकिटे प्रवाशांना रद्द करण्याची वेळ येते व यासाठी रेल्वेकडून ठराविक रक्कम कापली जाते. एप्रिल २०१९ पासून अवघ्या सहा महिन्यात देशभरात साडेतीन कोटींहून अधिक तिकिटे रद्द झाली व त्यातून थोडाथोडका नव्हे तर ३ हजार ४२० कोटींहून अधिकचा महसूल जमा झाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत भारतीय रेल्वेकडे विचारणा केली होती. एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत किती सामान्य व तत्काळ तिकिटे खरेदी करण्यात आली, यातून कितीचा महसूल मिळाला, किती तिकिटे रद्द झाली व त्यातून नेमका किती महसूल मिळाला हे प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ एप्रिल २०१९ ते ३० सप्टेंबर २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण १५ कोटी ५३ लाख ७७ हजार ५१३ तिकिटे काढण्यात आली. यातील सामान्य तिकिटे १२ कोटी ४५ लाख ५३ हजार ६०९ इतकी होती, तर तत्काळ तिकिटांची संख्या ३ कोटी ८ लाख २३ हजार ९०४ इतकी होती. यातून भारतीय रेल्वेला १७, ४५३ कोटी ६० लाख १ हजार ११५ रुपयांचा महसूल मिळाला. तर या कालावधीत ३ कोटी ५० लाख ४५ हजार ८८० तिकिटे रद्द झाली. यासाठी कापण्यात आलेल्या ठराविक रकमेतून भारतीय रेल्वेला ३,२० कोटी ११ लाख ९७ हजार १६८ रुपयांचा फायदा झाला.३० महिन्यांत तिकिटांतून ७८ हजार कोटींचा महसूलदरम्यान, एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१९ या ३० महिन्यांच्या कालावधीत देशभरात एकूण ६८ कोटी ६१ लाख ९९ हजार ५६ तिकिटे ‘बुक’ झाली. यातील १४ कोटी ७० लाख ३८ हजार ६८९ तिकिटे तत्काळ होती. एकूण तिकिटांमधून भारतीय रेल्वेला ७७, ९९८ कोटी ७५ लाख ४१ हजार ५१५ रुपयांचा निधी मिळाला. एकूण ‘बुक’ तिकिटांमधून १५ कोटी ६५ लाख ७१ हजार ५७ तिकिटे रद्द करण्यात आली व यातून रेल्वेला १५,१५६ कोटी २६ लाख ७६ हजार ७६५ रुपयांचा महसूल मिळाला.

टॅग्स :railwayरेल्वेticketतिकिटRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता