‘आरपीएफ’च्या गणवेशासंदर्भात अधिकार्यांची बैठक
By Admin | Updated: June 7, 2014 02:27 IST2014-06-07T02:27:10+5:302014-06-07T02:27:10+5:30
रेल्वे सुरक्षा दलाच्या गणवेशात बदल करण्यासाठी लखनौ येथील गणवेश

‘आरपीएफ’च्या गणवेशासंदर्भात अधिकार्यांची बैठक
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या गणवेशात बदल करण्यासाठी लखनौ येथील गणवेश समितीचे अध्यक्ष राजाराम यांनी नागपूरला भेट देऊन रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकारी-कर्मचार्यांची मध्य रेल्वेच्या नागपूर येथील रुग्णालयात बैठक घेतली.
देशभरातील आरपीएफ अधिकारी, जवानांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर त्यांचा गणवेश बदलविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
रेल्वे सुरक्षा दलाच्या गणवेश समितीचे लखनौ येथील अध्यक्ष तथा उपमुख्य सुरक्षा आयुक्त राजाराम शुक्रवारी नागपुरात दाखल झाले. ‘आरपीएफ’ जवानांच्या गणवेशात बदल करण्यासंदर्भात त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत याची माहिती जाणून घेण्यासाठी ही समिती देशभरातील आरपीएफ जवान, अधिकार्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. यात आरपीएफच्या सध्या अस्तित्वात असलेल्या गणवेशाला धक्का न लावता त्यात काय बदल करता येऊ शकतात याची चाचपणी ही समिती करीत आहे.
फेब्रुवारीपासून या समितीच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. यात विशेष म्हणजे महिलांना सलवार सुट द्यायचा की काय याबाबतही प्रतिक्रिया जाणून घेण्यात येत आहेत. बैठकीला सुरक्षा आयुक्त सी. एम. मिश्रा, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त डी. बी. गौर, सहायक सुरक्षा आयुक्त ए. के. स्वामी, सहायक सुरक्षा आयुक्त संजय चौधरी, विभागातील सर्व निरीक्षक आणि प्रत्येक रँकचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)