शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

नागपुरात ऑड-इव्हनचे संकट कायम, केवळ वेळ वाढविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 12:45 AM

राज्य शासनाच्या आदेशानुसार गुरुवार, ९ जुलैपासून सर्व बाजारपेठांमधील प्रतिष्ठाने ऑड-इव्हन पद्धतीनेच सुरू राहणार असून, केवळ सकाळी ९ ते ५ पर्यंत असलेल्या वेळात बदल करून दुकाने सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहतील.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या आदेशानुसार गुरुवार, ९ जुलैपासून सर्व बाजारपेठांमधील प्रतिष्ठाने ऑड-इव्हन पद्धतीनेच सुरू राहणार असून, केवळ सकाळी ९ ते ५ पर्यंत असलेल्या वेळात बदल करून दुकाने सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहतील.आॅड-इव्हन पद्धत रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे पाठविले आहे. याशिवाय दुकानाची वेळ वाढविण्याची मागणी करण्यात आल्याचे चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी सांगितले. राज्य शासनाच्या या नियमामुळे काहीही फरक पडणार नाही. दुकाने नियमित सुरू राहिल्यास ग्राहक बाजारात येतील आणि विक्री वाढेल. लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद राहिल्यानंतर आता तरी शासनाने व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.आॅड-इव्हनमध्ये एक दिवसाआड दुकाने सुरू असल्याने फूटपाथवरील विक्रेत्यांनी बंद दुकानांसमोरच ठिय्या मांडला आहे. यामुळेदुकानदारांसमोर विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. हे विक्रेते आता दुकानासमोरून हटायला तयार नाहीत. दुकानदारांचा त्यांच्याशी वाद होत आहे. इतवारी सराफा दुकानासमोर अनेक फूटपाथ दुकानदार दिसून येत आहे. दुकानात मौल्यवान वस्तू असल्याने धोका निर्माण झाला आहे. या दुकानदारांना तेथून हटवावे, अशी मागणी नागपूर सराफा असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे यांनी प्रशासनाकडे केली आहे. याशिवाय गांधीबाग बाजारात अनेक दुकानासमोरील जागेवर फूटपाथवरील विक्रेत्यांनी अवैध कब्जा केला आहे. या दुकानात ग्राहकांची गर्दी होत आहे. मास्क, सॅनिटायझर आणि ग्लोव्हजची सुविधा नसल्याने कोरोना प्रसाराचा धोका निर्माण झाला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी दुकानदार संघाने केली आहे.

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर