२५ ऑक्टोबरला शीतलच्या तर २७ नोव्हेंबरला विकास आमटे यांच्या लग्नाचा होता वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 16:02 IST2020-11-30T15:58:52+5:302020-11-30T16:02:13+5:30
महारोगी सेवा समिती वरोराचे प्रमुख डॉ. विकास व भारती आमटे यांच्या सहजीवनाचा ४४ वा वाढदिवस त्यांनी अगदी परवाच म्हणजे २७ नोव्हेंबरला साजरा केला होता.

२५ ऑक्टोबरला शीतलच्या तर २७ नोव्हेंबरला विकास आमटे यांच्या लग्नाचा होता वाढदिवस
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: महारोगी सेवा समिती वरोराचे प्रमुख डॉ. विकास व भारती आमटे यांच्या सहजीवनाचा ४४ वा वाढदिवस त्यांनी अगदी परवाच म्हणजे २७ नोव्हेंबरला साजरा केला होता. तर डॉ. शीतल व गौतम करजगी यांच्याही लग्नाचा १३ वा वाढदिवस २५ ऑक्टोबरला होता. पुण्याचे निवृत्त ले. कर्नल शिरीष करजगी यांचा मुलगा गौतम यांच्यासोबत शीतल आमटे यांचा विवाह आनंदवनच्या मुख्यमंत्री सभागृहात २००७ साली मोठ्या थाटामाटात करण्यात आला होता.
या विवाहाला अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.