चिमुकलीसोबत अश्लील चाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:09 IST2021-03-08T04:09:49+5:302021-03-08T04:09:49+5:30

---- मदन वाईन शॉपच्या मालकाला दणका नागपूर : दारूसाठ्याची अवैध विक्री करणारा मदन वाईन शॉपचा मालक सागर जयस्वाल याला ...

Obscene jokes with Chimukali | चिमुकलीसोबत अश्लील चाळे

चिमुकलीसोबत अश्लील चाळे

----

मदन वाईन शॉपच्या मालकाला दणका

नागपूर : दारूसाठ्याची अवैध विक्री करणारा मदन वाईन शॉपचा मालक सागर जयस्वाल याला परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनीता साहू यांच्या पथकाने चांगलाच दणका दिला.

साहू यांच्या विशेष पथकाने सदरच्या खलाशी लाईनमधील शुभम गणेश बुर्रेवार (वय २४) तसेच जैनबी अब्दुल रशिद या महिलेच्या घरी रविवारी सायंकाळी छापा घातला. तेथे विदेशी दारूच्या तसेच बिअरच्या बाटल्या आढळल्या. हा साठा आपण मदन वाईन शॉपचा मालक सागर जयस्वाल याच्याकडून आणल्याची माहिती जैनबीने पोलिसांना दिली. त्यावरून त्याच्याविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे. सहाय्यक निरीक्षक दिलीप चंदन, हवलदार रामदास नेरकर, आदित्य यादव, गणेश जागेकर,अमित सिंग, आलिम खान आणि सविता यांनी ही कामगिरी बजावली.

----

Web Title: Obscene jokes with Chimukali