दोन महिन्यात एनव्हीसीसीची निवडणूक

By Admin | Updated: June 2, 2014 02:18 IST2014-06-02T02:18:47+5:302014-06-02T02:18:47+5:30

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉर्मसची निवडणूक दोन महिन्यात होणार आहे.

NVCC election in two months | दोन महिन्यात एनव्हीसीसीची निवडणूक

दोन महिन्यात एनव्हीसीसीची निवडणूक

नागपूर : नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉर्मसची निवडणूक दोन महिन्यात होणार आहे. चेंबरच्या पुढाकाराने एलबीटी आंदोलन राज्यात गेले. त्याचे श्रेय कार्यरत पदाधिकार्‍यांना जाते. या आंदोलनामुळे सरकारने एलबीटी हटविण्याचा अलीकडेच निर्णय घेतल्याने जुन्याच पदाधिकार्‍यांना पुन्हा संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यंदाची निवडणूक केवळ सोपस्कार म्हणून राहील. दीपेन अग्रवाल यांना पुन्हा अध्यक्षपद बहाल होऊ शकते, अशी चिन्हे आहेत. पण पदाधिकार्‍यांमधील अंतर्गत कुजबूज ही यंदाची निवडणूक अविरोध होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकते.

यंदा काहींना वगळून नव्यांना संधी मिळेल. या वर्षी निवडणूक वा अविरोध निवड, हे पाहावे लागेल. पण सध्याच्या कार्यकारिणीत तणावाचे वातावरण असल्याचे बोलले जात असल्याने या वेळी मतदानाची जास्त शक्यता आहे.

तणाव असला तरीही सत्ता परिवर्तनाची काहीही शक्यता नाही आणि वर्तमान अध्यक्ष पुन्हा पदभार सांभाळू शकतात, अशीच शक्यता आहे.

प्रॉक्सी व्होटिंगवर प्रतिबंध

निवडणुकीत आतापर्यंंत मुख्य भूमिका बजावणार्‍या प्रॉक्सी व्होटिंगवर गेल्या महिन्यातच प्रतिबंध लावण्यात आले आहे. आतापर्यंंंत प्रॉक्सी व्होटिंगने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. निवडणूक झाल्यास मतदारांना चेंबरच्या कार्यालयात येऊन मतदान करावे लागेल. (प्रतिनिधी)

Web Title: NVCC election in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.