शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात चाचण्या वाढताच रुग्णसंख्येतही वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 10:37 PM

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे चाचण्यांची संख्या कमी झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात होते. विशेष म्हणजे, सोमवारी रॅपिड अ‍ॅन्टिजेन व आरटीपीसीआर मिळून केवळ २७०१ चाचण्या झाल्या, तर मंगळवारी चाचण्यांची संख्या अचानक ७११७वर पोहचली. यामुळे ५९० वर आलेली रुग्णसंख्या १,२१५ झाली.

ठळक मुद्दे१२१५ नवे रुग्ण, ३४ मृत्यूची भर : २७०० वरून ७००० वर गेल्या चाचण्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे चाचण्यांची संख्या कमी झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात होते. विशेष म्हणजे, सोमवारी रॅपिड अ‍ॅन्टिजेन व आरटीपीसीआर मिळून केवळ २७०१ चाचण्या झाल्या, तर मंगळवारी चाचण्यांची संख्या अचानक ७११७वर पोहचली. यामुळे ५९० वर आलेली रुग्णसंख्या १,२१५ झाली. आज ३४ रुग्णांचे बळी गेले. मृतांची एकूण संख्या २,४७२ तर रुग्णसंख्या ७७,०३० झाली आहे. नागपूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून रोज दोन्ही चाचण्यांची संख्या पाच हजाराखाली होत होत्या. यामुळे १५०० ते २०००च्या घरात जाणारी रुग्णसंख्या ५०० ते हजाराच्या आत आली. अचानक चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने शंका उपस्थित केल्या जात होत्या. परंतु मंगळवारी पुन्हा चाचण्यांची संख्या वाढली. शहरात ३,५८० तर ग्रामीणमध्ये ४४४ रुग्णांची अशी एकूण ४,०२४ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी झाली. रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचणी शहरात १५७२ तर ग्रामीणमध्ये १५२१ अशी एकूण ३०९३ रुग्णांची झाली.सर्वाधिक चाचण्या खासगीमध्येजिल्हा माहिती कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, आज सर्वाधिक चाचण्या खासगी लॅबमध्ये झाल्या. १६८७ रुग्णांची तपासणी झाली. यात ४०६रुग्ण पॉझिटिव्ह आले. अ‍ॅन्टिजेन चाचणीत ३५४ रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले. एम्सच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात १०९, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ९७, मेयोच्या प्रयोगशाळेत १५०, माफसूच्या प्रयोगशाळेत ५८ रुग्णांची नोंद झाली.१४१८ रुग्ण बरेबाधितांची संख्या वाढली असली तरी त्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आजही अधिक आहे. १४१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६१,११५ झाली असून याचे प्रमाण ७९.३३ टक्क्यांवर आले आहे. सध्या शासकीयसह खासगी रुग्णालयात १३,४४३ रुग्ण उपचार घेत आहेत.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ७,११७बाधित रुग्ण : ७७,०३०बरे झालेले : ६१,११५उपचार घेत असलेले रुग्ण : १३,४४३मृत्यू : २,४७२

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर