CoronaVirus in Nagpur : नागपुरात चाचण्या वाढताच रुग्णसंख्येतही वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 10:37 PM2020-09-29T22:37:24+5:302020-09-29T22:38:53+5:30

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे चाचण्यांची संख्या कमी झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात होते. विशेष म्हणजे, सोमवारी रॅपिड अ‍ॅन्टिजेन व आरटीपीसीआर मिळून केवळ २७०१ चाचण्या झाल्या, तर मंगळवारी चाचण्यांची संख्या अचानक ७११७वर पोहचली. यामुळे ५९० वर आलेली रुग्णसंख्या १,२१५ झाली.

As the number of tests increased in Nagpur, so did the number of patients | CoronaVirus in Nagpur : नागपुरात चाचण्या वाढताच रुग्णसंख्येतही वाढ

CoronaVirus in Nagpur : नागपुरात चाचण्या वाढताच रुग्णसंख्येतही वाढ

Next
ठळक मुद्दे१२१५ नवे रुग्ण, ३४ मृत्यूची भर : २७०० वरून ७००० वर गेल्या चाचण्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे चाचण्यांची संख्या कमी झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात होते. विशेष म्हणजे, सोमवारी रॅपिड अ‍ॅन्टिजेन व आरटीपीसीआर मिळून केवळ २७०१ चाचण्या झाल्या, तर मंगळवारी चाचण्यांची संख्या अचानक ७११७वर पोहचली. यामुळे ५९० वर आलेली रुग्णसंख्या १,२१५ झाली. आज ३४ रुग्णांचे बळी गेले. मृतांची एकूण संख्या २,४७२ तर रुग्णसंख्या ७७,०३० झाली आहे. नागपूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून रोज दोन्ही चाचण्यांची संख्या पाच हजाराखाली होत होत्या. यामुळे १५०० ते २०००च्या घरात जाणारी रुग्णसंख्या ५०० ते हजाराच्या आत आली. अचानक चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने शंका उपस्थित केल्या जात होत्या. परंतु मंगळवारी पुन्हा चाचण्यांची संख्या वाढली. शहरात ३,५८० तर ग्रामीणमध्ये ४४४ रुग्णांची अशी एकूण ४,०२४ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी झाली. रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचणी शहरात १५७२ तर ग्रामीणमध्ये १५२१ अशी एकूण ३०९३ रुग्णांची झाली.

सर्वाधिक चाचण्या खासगीमध्ये
जिल्हा माहिती कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, आज सर्वाधिक चाचण्या खासगी लॅबमध्ये झाल्या. १६८७ रुग्णांची तपासणी झाली. यात ४०६रुग्ण पॉझिटिव्ह आले. अ‍ॅन्टिजेन चाचणीत ३५४ रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले. एम्सच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात १०९, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ९७, मेयोच्या प्रयोगशाळेत १५०, माफसूच्या प्रयोगशाळेत ५८ रुग्णांची नोंद झाली.

१४१८ रुग्ण बरे
बाधितांची संख्या वाढली असली तरी त्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आजही अधिक आहे. १४१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६१,११५ झाली असून याचे प्रमाण ७९.३३ टक्क्यांवर आले आहे. सध्या शासकीयसह खासगी रुग्णालयात १३,४४३ रुग्ण उपचार घेत आहेत.

कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ७,११७
बाधित रुग्ण : ७७,०३०
बरे झालेले : ६१,११५
उपचार घेत असलेले रुग्ण : १३,४४३
मृत्यू : २,४७२

Web Title: As the number of tests increased in Nagpur, so did the number of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.