मास्कशिवाय फिरणाऱ्यांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:10 IST2021-07-07T04:10:59+5:302021-07-07T04:10:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

The number of people walking without masks increased | मास्कशिवाय फिरणाऱ्यांची संख्या वाढली

मास्कशिवाय फिरणाऱ्यांची संख्या वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असतानाही नागपूर शहरात मागील काही दिवसात मास्कशिवाय फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ५३ नागरिकांविरूध्द कारवाई केली. त्यांच्याकडून २६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.

मागील काही महिन्यात शोधपथकांनी मास्कशिवाय फिरणाऱ्या ३८,८५८ नागरिकांविरूध्द कारवाई केली. आतापर्यंत १ कोटी ७७ लाख ८८ हजारांचा दंड वसूल केला आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी संसर्गाचा धोका टळलेला नाही. परंतु नागरिक सुरक्षित अंतर न ठेवता व ‍विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसतात, ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत १, धरमपेठ ३, हनुमाननगर १३, नेहरूनगर १०, गांधीबाग ९, सतरंजीपुरा झोनअंतर्गत २, लकडगंज ९, आशीनगर झोनअंतर्गत ३ आणि मंगळवारी झोनअंतर्गत ३ जणांविरूध्द ही कारवाई करण्यात आली.

Web Title: The number of people walking without masks increased