विदर्भात रुग्णसंख्या आठ हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:08 IST2021-04-05T04:08:20+5:302021-04-05T04:08:20+5:30

नागपूर : विदर्भात सलग तीन दिवस रुग्णसंख्येचा आकडा सात हजारांवर होता व रविवारी त्यात आणखी वाढ झाली. रविवारी तब्बल ...

The number of patients in Vidarbha is over eight thousand | विदर्भात रुग्णसंख्या आठ हजारांवर

विदर्भात रुग्णसंख्या आठ हजारांवर

नागपूर : विदर्भात सलग तीन दिवस रुग्णसंख्येचा आकडा सात हजारांवर होता व रविवारी त्यात आणखी वाढ झाली. रविवारी तब्बल ८ हजार ३१३ रुग्णांची नोंद झाली, तर ९४ जणांचा मृत्यू झाला. सुमारे ५० टक्के रुग्ण व ६५ टक्के मृत्यू हे नागपूर जिल्ह्यातीलच आहेत. नागपूरसह चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, बुलडाणा येथे रुग्णसंख्येत वाढ झाली.

सर्वात जास्त ४ हजार ११० रुग्ण नागपुरात नोंदविले गेले, तर ६२ जणांचा मृत्यू झाला. बुलडाण्यात रुग्णांचा आकडा हजारपार गेला. तेथे १ हजार २२ बाधित आढळले व ६ रुग्णांचा मृत्यू झाला. भंडाऱ्यात ८४४ रुग्ण व १ बळी नोंदविण्यात आले. वर्धा (३२२ रुग्ण, ६ मृत्यू), गडचिरोली (१११ रुग्ण, १ मृत्यू), चंद्रपूर (३६४ रुग्ण, ३ मृत्यू) येथेदेखील रुग्णांमध्ये वाढ नोंदविण्यात आली.

जिल्हानिहाय रुग्ण व मृत्यूसंख्या

जिल्हा : नवे रुग्ण : मृत्यू

नागपूर : ४,११० : ६२

भंडारा : ८४४ : ०१

चंद्रपूर : ३६४ : ०३

वर्धा : ३२२ : ०६

गोंदिया : ३१२ : ००

गडचिरोली : १११ : ०२

यवतमाळ : ४२५ : ०८

बुलडाणा : १,०२२ : ०६

अकोला : २६६ : ०२

अमरावती : ३०३ : ०१

वाशिम : २३४ : ०३

Web Title: The number of patients in Vidarbha is over eight thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.